अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचा मागण्यांसाठी मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:43 AM2017-10-07T01:43:56+5:302017-10-07T01:44:14+5:30

भारतीय चिकित्सा पद्धतीसह अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांवर निर्बंध घालण्यासाठी निती आयोगाच्या माध्यमातून केंद्राला सादर करण्यात आलेल्या विधेयकाचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाभरातील आयएसएम तथा अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी शुक्रवारी (दि. ६) शहरातील रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

Silent Front for Asking Allopathy Physicians | अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचा मागण्यांसाठी मूक मोर्चा

अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचा मागण्यांसाठी मूक मोर्चा

googlenewsNext

नाशिक : भारतीय चिकित्सा पद्धतीसह अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांवर निर्बंध घालण्यासाठी निती आयोगाच्या माध्यमातून केंद्राला सादर करण्यात आलेल्या विधेयकाचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाभरातील आयएसएम तथा अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी शुक्रवारी (दि. ६) शहरातील रस्त्यावर उतरून आंदोलन केले. डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी गोल्फ क्लब मैदानापासून मूक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.
आयुर्वेदासह युनानी डॉक्टर्स प्रचलित कायद्यानुसार भारतीय चिकित्सा पद्धती व अ‍ॅलोपॅथीचा पूरक वापर करीत रुग्णसेवा देतात. मात्र या दोन्हीही पद्धतीने औषधोपचार करणाºया डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीच्या वापरास निर्बंध घालण्याची तरतूद असलेले नवीन विधेयक निती आयोगाने केंद्र सरकारकडे सादर केले आहे. या विधेयकाविरोधात नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून या कायद्याला विरोध नोंदवत जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. निमातर्फे काढण्यात आलेल्या या मोर्चात आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. हेमलता पाटील, संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल पगार, ललित जाधव, डॉ. देवेंद्र बच्छाव, तुषार निकम, संघटक डॉ. व्यंकटेश पाटील, डॉ. भूषण वाणी, राजेंद्र खरात, डॉ. प्रतिभा वाघ, डॉ. मनीष हिरे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Silent Front for Asking Allopathy Physicians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.