गौैरी लंकेश हत्येच्या निषेधार्थ मूक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:36 AM2017-09-07T00:36:22+5:302017-09-07T00:36:47+5:30
नाशिक : ज्येष्ठ पुरोगामी पत्रकार तथा स्तंभ लेखक गौरी लंकेश यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांची हत्या करणाºया कट्टरवादी शक्तींचा नाशिक शहरातील सर्व पुरोगामी संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर मूक आंदोलन करून निषेध केला.
नाशिक : ज्येष्ठ पुरोगामी पत्रकार तथा स्तंभ लेखक गौरी लंकेश यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांची हत्या करणाºया कट्टरवादी शक्तींचा नाशिक शहरातील सर्व पुरोगामी संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर मूक आंदोलन करून निषेध केला.
राज्यात यापूर्वी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, डाव्या विचारसरणीचे गोविंद पानसरे यांचा व ज्येष्ठ कन्नड साहित्यिक प्रा. कलबुर्गी याच्यावरही अशाचप्रकारे हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती. परंतु, या तिन्ही घटनांमधील एकाही आरोपीला अटक होऊन शिक्षा झालेली नाही. या हत्याकांड मालिकेच्या आता पत्रकार गौरी लंकेश बळी ठरल्या आहेत. गौरी लंकेश यांनी त्यांच्या लेखणीतून अंधश्रद्धेत गुरफटलेल्या व्यवस्थेवर प्रहार करून कर्नाटकातील समाज प्रबोधनाचा लढा उभा करताना प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येविरोधात सातत्याने लेखन सुरू ठेवले होते. त्यामुळेच त्यांच्यावर असा भ्याड हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप पुरोगामी विचारांच्या संघटनांनी यावेळी केला. देशभरात पत्रकार तथा समाज सुधारकांच्या हत्यांचे सत्र सुरू असून, केंद्र सरकार व राज्य सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे अशा समाजविघातक शक्तींचे धाडस वाढत असून, हा लोकशाहीच्या आधारस्तंभावर आघात असल्याच्या भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या असून, गौरी लंकेश याची हत्या करणाºयांचा तपास वेगाने करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. याआंदोलनात शांताराम चव्हाण, राकेश पवार, पद्माकर इंगळे, राजू देसले, योगेश कापसे, रमेश ठाकूर, सुरेश नखाते, विशाल रणमाने, विराज देवांग, ज्योती नटराजन, श्यामला चव्हाण, रोशन वाघ, महेंद्र दातरंगे, शरद कोकाटे, अॅड. राजपालसिंग राणा आदी उपस्थित होते.