कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मूक आंदोलन
By admin | Published: July 14, 2017 01:15 AM2017-07-14T01:15:30+5:302017-07-14T01:15:56+5:30
नाशिक : बलात्कार व हत्या प्रकरणाला वर्ष पूर्ण होऊनही आरोपींना शिक्षा करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करूण्यात आले.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होऊनही या खटल्याचा निकाल लागलेला नसून, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करून निवेदन देण्यात आले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपर्डी येथील घटनेला १३ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झाले असून, दुर्दैवाची बाब म्हणजे यासंदर्भातील खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू असतानाही त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही.