विव्हळणाऱ्या ‘गज’लक्ष्मीचा मूक आक्रोश स्वार्थी दुनियादारी : जखमी हत्तिणीच्या वेदनांकडे वनविभागाची डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:27 AM2018-05-09T01:27:49+5:302018-05-09T01:27:49+5:30

नाशिक : मुक्या जिवांवर उदार होऊन आपला स्वार्थ पूर्ण करणे ही पूर्वापार मानवी प्रवृत्ती राहिली आहे. सध्या असेच काहीसे चित्र नाशिकनगरीत बघावयास मिळत आहे.

The silent resentment of the 'gazlakshmi' of the distressed selfish worldly: the eyesight of the forest section on the wages of the injured hand | विव्हळणाऱ्या ‘गज’लक्ष्मीचा मूक आक्रोश स्वार्थी दुनियादारी : जखमी हत्तिणीच्या वेदनांकडे वनविभागाची डोळेझाक

विव्हळणाऱ्या ‘गज’लक्ष्मीचा मूक आक्रोश स्वार्थी दुनियादारी : जखमी हत्तिणीच्या वेदनांकडे वनविभागाची डोळेझाक

Next
ठळक मुद्देडांबरी रस्त्याची तप्त वाट तुडवत दारोदार फिरविले जात आहेधोका पोहोचल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न

नाशिक : मुक्या जिवांवर उदार होऊन आपला स्वार्थ पूर्ण करणे ही पूर्वापार मानवी प्रवृत्ती राहिली आहे. सध्या असेच काहीसे चित्र नाशिकनगरीत बघावयास मिळत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी महाकाय हत्तिणीला जखमी अवस्थेत भर उन्हाळ्यात डांबरी रस्त्याची तप्त वाट तुडवत दारोदार फिरविले जात आहे. या हत्तिणीच्या शरीरावर जागोजागी जखमा असून, तिच्या वेदनांकडे तथाकथित मालकासह वनविभागही डोळेझाक करीत असल्याने तिला वेदनादायी आयुष्य जगावे लागत आहे. सामान्यत: आवाक्याबाहेरील वस्तू सांभाळताना हत्ती पोसणे असा शब्दप्रयोग केला जातो. मात्र प्रस्तुत प्रकरणात हत्तीच आपल्या कथीत मालकाला पोसत आहे. एवढे करूनही त्या गजलक्ष्मीची शुश्रूषा होत नसेल तर आणि त्यातून या हत्तिणीच्या जीविताला धोका पोहोचल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न प्राणी मित्र करीत आहेत. म्हसरूळ परिसरातून जाणाºया मार्गालगत एका झोपडीच्या शेजारी ‘लक्ष्मी’ नावाची हत्तीण हमखास नजरेस पडते. ४५ वर्षीय लक्ष्मी याठिकाणी बेवारस स्थितीत बांधलेली असते. या हत्तिणीचा मालक असल्याचे सांगणारी व्यक्ती ही परराज्यातील असून, ती एक भिक्षेकरी आहे. आपल्याला ही हत्तीण दानपात्रात मिळाल्याचे तो सांगतो. मात्र, या हत्तिणीची देखभाल किती केली जात असेल याविषयी शंकाच आहे. सध्या या हत्तिणीच्या म्हणजेच लक्ष्मीच्या शरीरावर जागोजागी जखमा झाल्या असून, त्यावर फुंकर घालण्याचे कष्टही त्याच्याकडून घेतले जात नाही. लक्ष्मीच्या एका डोळ्याला मोतीबिंदू झाला आहे. तिच्या मानेवरती एक भलीमोठी जखम असून, त्याचा संसर्ग तिच्या शरीराच्या इतर भागात होताना दिसत आहे. या हत्तिणीच्या शरीरावर जागोजागी जखमा झाल्या आहेत. लक्ष्मीच्या एका डोळ्याला मोतीबिंदू झाला आहे. तिच्या मानेवरती एक भलीमोठी जखम असून, त्याचा संसर्ग तिच्या शरीराच्या इतर भागात होताना दिसत आहे. तसेच कानावर फोड आले असून, शरीराच्या मागच्या भागाला एक मोठी जखम झाली आहे. त्यामुळे तिला बसताना प्रचंड वेदना होत असाव्यात.

Web Title: The silent resentment of the 'gazlakshmi' of the distressed selfish worldly: the eyesight of the forest section on the wages of the injured hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल