आशा गटप्रवर्तकांचे मानधनवाढीसाठी मूक निदशर्ने ; मुख्यमंत्र्यांना गुलाब पुष्प देऊन घालणार साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 03:44 PM2019-09-16T15:44:33+5:302019-09-16T15:57:38+5:30

महाराष्ट्रात सुमारे ९० हजार  आशा व गटप्रवर्तक  आरोग्य विभागात कार्यरत असून या सर्वांनी गेल्या पंधरवड्यापासून आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या माध्यमातून कामबंद आंदोनलन पुकारले असून अद्याप सरकारने या राज्यव्यापी आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे नाशिकमधील आशा व गटप्रवर्तकांनी सोमवारी (दि.१६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यासोर मूक निदर्शेने करीत नाशिकमध्ये संवाद यांत्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांना गुलाब पुष्प देऊन आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी साकडे घालणार आहे. 

Silent Tips for Raising Hope Group Promoters; Chief Minister will be given a bouquet of roses | आशा गटप्रवर्तकांचे मानधनवाढीसाठी मूक निदशर्ने ; मुख्यमंत्र्यांना गुलाब पुष्प देऊन घालणार साकडे

आशा गटप्रवर्तकांचे मानधनवाढीसाठी मूक निदशर्ने ; मुख्यमंत्र्यांना गुलाब पुष्प देऊन घालणार साकडे

Next
ठळक मुद्देआशा व गटप्रवर्तकांची मानधन वाढीची मागणी मागील 15 दिवसांपासून कामबंद आंदोलन मुख्यमंत्र्यांना गुलाबपुष्प देऊन घालणार साकडे

नाशिक : महाराष्ट्रात सुमारे ९० हजार  आशा व गटप्रवर्तक  आरोग्य विभागात कार्यरत असून या सर्वांनी गेल्या पंधरवड्यापासून आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या माध्यमातून कामबंद आंदोनलन पुकारले असून अद्याप सरकारने या राज्यव्यापी आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे नाशिकमधील आशा व गटप्रवर्तकांनी सोमवारी (दि.१६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यासोर चेहऱ्यांवर काळे कपडे बांधून मूक निदर्शेने केली. तसेच संवाद यांत्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांना गुलाब पुष्प देऊन  मागण्या मान्य करण्यासाठी साकडे घालणार असल्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.
आशा व गटप्रवर्तकांतर्फे राज्यभर मोर्चे, जेलभरो, आंदोलन, आमदार खासदारांना निवेदन, राज्यातील मंत्र्यांना संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहेत. आशा व गटप्रवर्तकांना राज्य शासनानेतीनपट मानधन वाढीचे दिलेले आश्वासन निवडणूक आचार संहिता जाहीर होण्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे, तसेच यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करावा या मागणीसाठी आशा व गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरु असून शनिवारी नाशिक शहरात कृतीसमितीच्या यावेळी अर्चना गडाख, विजय दराडे,  सायली महाले,  ज्योती गोडसे, अरुणा आव्हाड, सुरांजे गायत्री,  शीतल खत्री, धनश्री गाडे, पौर्णिमा भगत, कावेरी बेंडकुळी, मिना अत्रे,  प्रणाली सोनवणे,  संगीता वाघ,  सरला बोरसे आदी शेकडो आशा व गटप्रवर्तकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यासमोर मूक निदर्शेने केली. त्याचप्रमाणे जिल्हाभरात तालुकास्तरावर महापुरुषांच्या पुतळयाजवळ मूक निदर्शने करीत आशा व गट प्रवर्तकांना मागण्या तत्काळ मान्य करण्याची मागणी केली असून व्यात मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या नाशिकमधील रोड शो दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक १५ हजार  गुलाब पुष्प देऊन आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी साकडे घालणार आहेत. 
 

Web Title: Silent Tips for Raising Hope Group Promoters; Chief Minister will be given a bouquet of roses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.