‘सिल्व्हर लोट्स’ला साहित्य परिषदेकडून पुस्तकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 05:47 PM2018-12-26T17:47:14+5:302018-12-26T17:47:30+5:30

सिन्नर : येथील सिल्व्हर लोट्स इंग्लिश मीडिअम स्कूलला सिन्नरच्या साहित्य परिषद, यांच्याकडून सहा हजार रूपयांची अवांतर वाचनाच्या ४२ पुस्तकांची भेट देण्यात आली.

'Silver Lots' is a gift from books by the Sahitya Parishad | ‘सिल्व्हर लोट्स’ला साहित्य परिषदेकडून पुस्तकांची भेट

‘सिल्व्हर लोट्स’ला साहित्य परिषदेकडून पुस्तकांची भेट

Next

सिन्नर : येथील सिल्व्हर लोट्स इंग्लिश मीडिअम स्कूलला सिन्नरच्या साहित्य परिषद, यांच्याकडून सहा हजार रूपयांची अवांतर वाचनाच्या ४२ पुस्तकांची भेट देण्यात आली.
कविता संग्रह, कथासंग्रह, विद्यार्थ्यांसाठी काही प्रोत्साहात्मक पुस्तकांचा यात समावेश आहे. या पुस्तकांचे वाटप करण्यासाठी मसापचे अध्यक्ष राजाराम मुंगसे, किरण भावसार, शिवशाहीर स्वप्नील डुंबरे, मनोहर कासार, कार्याध्यक्ष रवींद्र कांगणे उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक दिलीप बिन्नर, संचालक सोनल बिन्नर, कॅम्पस डायरेक्टर एल. डी. ढोन्नर यांनी पुस्तकांचा स्विकार केला. कांगणे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर अंगाला शहारे आणणारी कविता सादर केली. किरण भावसार यांनी स्वप्न वेड्या पंखांसाठी या बालकविता संग्रहाच्या सहा प्रती शाळेला भेट दिल्या, त्यातील काही कवितांचे सादरीकरण केले. डुंबरे यांनी शिवजन्मावर आधारित पोवाड्याचे गायन जोशात केले. मुंगसे यांनी २० जानेवारी रोजी होणाºया साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीचा मान सिल्व्हर लोट्स स्कूलला देण्याचे आश्वासन दिले.

Web Title: 'Silver Lots' is a gift from books by the Sahitya Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.