मंदिरातून मूर्तीसह चांदीच्या वस्तू लांबविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:14 AM2021-02-15T04:14:02+5:302021-02-15T04:14:02+5:30

दरम्यान, याप्रकरणी शेवंताबाई लक्ष्मण म्हस्के (रा. रामकृष्णनगर) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Silver objects, including idols, were removed from the temple | मंदिरातून मूर्तीसह चांदीच्या वस्तू लांबविल्या

मंदिरातून मूर्तीसह चांदीच्या वस्तू लांबविल्या

Next

दरम्यान, याप्रकरणी शेवंताबाई लक्ष्मण म्हस्के (रा. रामकृष्णनगर) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १०) रात्री ते गुरुवारी सकाळदरम्यान अज्ञात चोरट्याने मंदिराच्या दरवाजाची कडी वाकवून आतमध्ये प्रवेश केला, व मंदिरातील ३० हजार रुपये किमतीच्या तीन देवींच्या मूर्ती, ११ हजार रुपये किमतीचे सात चांदीचे देव, चांदीचे दोन घोडे व नऊ पाळणे चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

------------

शहरातून तीन दुचाकी लंपास

नाशिक : शहर परिसरातून तीन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी विविध ठिकाणांहून लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शनिवारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पहिली घटना एमजी रोड परिसरात घडली. हरीष दत्तू निपळुंगे (रा. गंगापूर रोड) यांनी मंगळवारी (दि. ९) त्यांची अ‍ॅक्टिव्हा (एमएच १५ जीजी ५६५४) एमजी रोडवर उभी केली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. दुसऱ्या घटनेत राजू बाळकृष्ण सुतार (रा. सौभाग्यनगर) यांनी त्यांची अ‍ॅक्टिव्हा (एमएच १५ जीक्यू ३५३२) सोमवारी (दि. ८) अज्ञात चोरट्याने लंपास केली. तिसऱ्या घटनेत मोटरसायकल (एमएच १५ एफआर ०७५४) एका हॉटेलच्या मागे उभी केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची ३५ हजार रुपये किमतीची ही मोटरसायकल चोरून नेली. सागर पुंडलिक व्यवहारे यांनी याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

----------

खिडकीचे गज वाकवून घरफोडी

नाशिक : किचन रूमच्या खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी संदीप ज्ञानदेव दरेकर (रा. पाथर्डी शिवार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरात कोणी नसताना अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या स्वयंपाकघराच्या खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला व ५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, २० हजार रुपये किमतीचे चांदीचे मोदक, ७ हजारांची रोकड, बेनटेक्सच्या दोन पाटल्या, चार बांगड्या, लॅपटॉपचे हेडफोन एअर गन, रेडिओ कारवा आदी वस्तूंवर डल्ला मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

----------

Web Title: Silver objects, including idols, were removed from the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.