नाचलोंढीच्या वर्षाने गाजवली दिल्ली, धावण्याच्या स्पर्धेत सिल्वरमेडल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:16 PM2018-02-23T14:16:34+5:302018-02-23T14:16:49+5:30

पेठ- आगामी आॅलंपिक स्पर्धांमध्ये सहभागाचे सोनेरी स्वप्न उराशी बाळगून पेठ तालुक्यातील नाचलोंढी सारख्या दुर्गम पाडयावरील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी वर्षा चौधरी या धावपटूने आगेकूच सुरूच ठेवली असून गुरु वारी दिल्ली येथे झालेल्या पात्रता चाचणी ४०० मी. धावण्याच्या स्पधेत सिल्वर मेडल पटकावत आपला दबदबा कायम ठेवला आहे.

Silvermade in Ranji Trophy | नाचलोंढीच्या वर्षाने गाजवली दिल्ली, धावण्याच्या स्पर्धेत सिल्वरमेडल

नाचलोंढीच्या वर्षाने गाजवली दिल्ली, धावण्याच्या स्पर्धेत सिल्वरमेडल

googlenewsNext

पेठ- आगामी आॅलंपिक स्पर्धांमध्ये सहभागाचे सोनेरी स्वप्न उराशी बाळगून पेठ तालुक्यातील नाचलोंढी सारख्या दुर्गम पाडयावरील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी वर्षा चौधरी या धावपटूने आगेकूच सुरूच ठेवली असून गुरु वारी दिल्ली येथे झालेल्या पात्रता चाचणी ४०० मी. धावण्याच्या स्पधेत सिल्वर मेडल पटकावत आपला दबदबा कायम ठेवला आहे. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हिच्या आंतरराष्ट्रीय यशाने प्रेरीत झालेल्या नाचलोंढी येथील वर्षा चौधरी हिनेही कठोर मेहनत करून आगामी आॅलिंपिक स्पधेत सहभागासाठी कंबर कसली आहे. दिल्ली येथे गॅस अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया ( गेल) व नॅशनल युवा को -आॅप. सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पात्रता स्पर्धोत इंडियन तेज गेल रफ्तार प्रकारात बेस्ट टाईमिंग साधत ४०० मी.मध्ये मेडल पटकावत आपली विजयी दौड कायम ठेवली आहे.आदिवासी भागातील दºयाखोºयातील खडतर मार्गावरून आणवाणी धावणारी वर्षा आता देशाचे प्रतिनिधित्व करणार असल्याने नाचलोंढी गावात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सावरपाडा एक्सप्रेसनंतर आता लवकरच नाचलोंढी सुपरफास्ट जगाच्या नकाशावर झळकणार आहे. प्रशिक्षक भगवान हिरकूड, विजेंद्र सिंह यांचे तिला मार्गदर्शन मिळत आहे.

Web Title: Silvermade in Ranji Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक