जैन धर्म समजायला सरळ, स्पष्ट: राजेश जैन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 01:19 AM2019-11-18T01:19:01+5:302019-11-18T01:19:35+5:30
जैन धर्माकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा असून, या धर्माकडून समाजाला प्रचंड अपेक्षा आहेत. त्यामुळे जैन धर्मीयांच्या बोलण्यात, वागण्यात आस्था असायला हवी. हजारो वर्षांची परंपरा असलेला हा समाज आपल्या तत्त्वज्ञानाने श्रेष्ठ ठरतो. खरं तर हा धर्म समजायला खूपच सरळ अन्् स्पष्ट आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सनदी लेखापाल राजेश जैन यांनी केले.
नाशिक : जैन धर्माकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा असून, या धर्माकडून समाजाला प्रचंड अपेक्षा आहेत. त्यामुळे जैन धर्मीयांच्या बोलण्यात, वागण्यात आस्था असायला हवी. हजारो वर्षांची परंपरा असलेला हा समाज आपल्या तत्त्वज्ञानाने श्रेष्ठ ठरतो. खरं तर हा धर्म समजायला खूपच सरळ अन्् स्पष्ट आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सनदी लेखापाल राजेश जैन यांनी केले.
चुंचाळे शिवारात असलेल्या अशोका युनिव्हर्सल स्कूलमधील सभागृहात आयोजित दि जैन फिलॉसॉफिकल सोसायटीच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात ‘जैनिझम इन मशीन एज’ याविषयावर ते बोलत होते. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष जी. बी. शहा, सचिव डॉ. विक्र म शाह, खजिनदार रजनभाई शाह, ट्रस्टी डॉ. मतिल शहा, रंजना शाह, प्रांजल शाह, त्रिशला शाह आदी उपस्थित होते.
दुसºया सत्राचे पुष्प गुंफताना इस्त्रोचे स्पेस शास्त्रज्ञ नरेंद्र भंडारी यांनी ‘जैन तत्त्वज्ञान’ या विषयार उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी म्हटले की, ‘जैन तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केल्यामुळे जपानच्या शास्त्रज्ञास सर्वोच्च असे नोबेल पारितोषिक मिळाले. आज जगाने जैन तत्त्वज्ञान सर्वश्रेष्ठ असल्याचे मान्य केले हेच यावरून सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तुविशारद शिल्पाबेन छेडा यांनी ‘जैन आर्ट’ या विषयावर बोलताना ‘गुंफा, स्तुप व मंदिरे’ यांचा ऐतिहासिक प्रवास विशद केला. अंबानी ग्रुपचे सल्लागार वल्लभजी भन्साळी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोना शहा यांनी केले. रंजनभाई शाह यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाभरातील जैन बांधव उपस्थित होते.
प्रत्येक धर्मात मनुष्यहिताचे तत्वज्ञान
राजेश जैन म्हणाले की, जगातील प्रत्येक धर्मात मनुष्यहिताचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. जैन धर्माचे आचरण करताना तत्त्वांचा गोंधळ होऊ देता कामा नये. पहिल्या सत्राचे पुष्प गुंफताना, यश जैन यांनी ‘सम्यक दर्शन’ याविषयावर विचार व्यक्त करताना म्हणाले की, ‘जैन धर्मात सम्यक दर्शनाशिवाय सर्व क्रि या व्यर्थ आहेत. कारण सम्यकदर्शनाविना सम्यक ज्ञान व सम्यक मोक्षाची प्राप्ती होणार नाही. विविध तत्त्ववेत्यांच्या मते, सम्यकदर्शन म्हणजे जागरूकता होय.