साधेपणाने चंपाषष्ठी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:14 AM2020-12-22T04:14:40+5:302020-12-22T04:14:40+5:30
यावेळी योग तज्ज्ञ डॉ. प्रज्ञा पाटील यांनी योग आणि कोरोनावर माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे ...
यावेळी योग तज्ज्ञ डॉ. प्रज्ञा पाटील यांनी योग आणि कोरोनावर माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि मास्क परिधान करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. आमदार सरोज अहिरे, आमदार सीमा हिरे, सभागृह नेता सतीश सोनवणे, नगरसेवक भगवान दोंदे, संगीता जाधव, पुष्पा आव्हाड, अमोल जाधव आदींनी हजेरी लावली. शांताराम महाराज बोडके यांनी मार्गदर्शन केले. सुदाम कोंबडे यांनी सर्वांचे स्वागत केले. मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश जगताप, कार्याध्यक्ष बाकेराव डेमसे, मदन डेमसे, निवृत्ती गवळी, भिकाभाऊ डेमसे, चंद्रभान कोंबडे, रावसाहेब डेमसे, तानाजी गवळी, सोमनाथ शिंदे, रामदास जाचक, तुकाराम चौधरी, ज्ञानेश्वर कोंबडे, खंडेराव धोंगडे, विश्वनाथ धोंगडे,राजू जुन्नरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
------
भाविकांनी बाहेरून दर्शन घेतले
इंदिरानगर : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या गजरात परिसरातील खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी साजरी करण्यात आली . कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मंदिर सकाळी महापूजा झाल्यानंतर गर्दी होऊ नये म्हणून मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. अरुणोदय सोसायटीतील खंडेराव महाराज मंदिरात सकाळी साडेसात वाजता महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी प्रकाश मालपाठक, उपेंद्र कुलकर्णी, आप्पा कुलकर्णी, सुनील ओतारी आदी भाविक उपस्थित होते. चेतना नगर येथील खंडोबा महाराज मंदिरात सकाळी महापूजा करण्यात येऊन मंदिर बंद ठेवण्यात आले. त्यामुळे भाविकांनी बाहेरून दर्शन घेऊन समाधान मानले.