सिंधी पंचायत देवळालीची निवडणूक घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:14 AM2020-12-22T04:14:42+5:302020-12-22T04:14:42+5:30
सिंधी बांधवांनी एकत्र येत १९४८ मध्ये स्थापना केलेल्या पंचायतची दर दोन वर्षांनी निवडणूक होते. पंधरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी यंदा ...
सिंधी बांधवांनी एकत्र येत १९४८ मध्ये स्थापना केलेल्या पंचायतची दर दोन वर्षांनी निवडणूक होते. पंधरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी यंदा ६०० पेक्षा अधिक मतदार आहेत. नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आगामी द्विवार्षिक निवडणूक घेण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राजू नागदेव यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना जगदीश हेमनानी व ईश्वर धामेजा हे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम बघणार आहेत. निवडणूक अधिकारी यांनी घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार पूज्य सिंध पंचायत कार्यालयात दिनांक २० ते २५ डिसेंबर दरम्यान मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, २८ डिसेंबर ते १ जाने २०२१ दरम्यान ११ ते २ या वेळेत उमेदवारी अर्ज वाटप केले जाणार आहे. ३ ते ६ जानेवारी सकाळी ११ ते २ या वेळेत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. १० जानेवारी रोजी अर्ज छाननी, १३ जानेवारी रोजी माघार घेणे, निवडणूक बिनविरोध न झाल्यास १८ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत मतदान प्रक्रिया राबविण्यात येईल व त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता मतमोजणी होणार आहे.