जिल्ह्यात ‘सिंघम’ अवतरणार; दहाव्या मिनिटाला पोलीस मदत मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:16 AM2021-05-25T04:16:02+5:302021-05-25T04:16:02+5:30
नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र अत्यंत मोठे आहे. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गावे, आदिवासी पाड्यांची संख्या जास्त आहे; तसेच सुरगाणा, पेठ, ...
नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र अत्यंत मोठे आहे. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गावे, आदिवासी पाड्यांची संख्या जास्त आहे; तसेच सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण यांसारख्या दुर्गम तालुक्यांचा बहुतांश भाग हा गुजरात सीमेला लागून आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत संपूर्ण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या स्तरावरील मिळून एकूण ४० पोलीस ठाणे आहेत. यासाठी जिल्ह्यात सुमारे ३ हजार ६०० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्ह्यात मालेगावसारख्या अतिसंवेदनशील तालुक्याचाही समावेश आहे. जिल्ह्यातील कुठल्याही कानाकोपऱ्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास तत्काळ पोलिसांना पोहोचण्यास विविध अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते, तसेच आपत्कालीन मदत देण्यासाठीही दमछाक होते. यामुळे राज्य शासनाच्या गृह विभागाने जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयाला नवीन दुचाकी, चारचाकी वाहनेही पुरविली आहेत.
---इन्फो--
‘कॉल’ येताच वाहनाला मिळेल लोकेशन
‘११२’ या टोल-फ्री क्रमांकावर कॉल प्राप्त होताच तत्काळ लोकेशन संबंधित जिल्ह्यातील त्या जवळच्या स्पॉटवर तैनात असलेल्या पोलीस वाहनाला मिळेल आणि तेथून त्वरित पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना होतील. यामुळे नियंत्रण कक्षातून कॉल संबंधित पोलीस ठाण्याला मिळेपर्यंत आणि त्या पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्या घटनास्थळी दाखल होईपर्यंत वाया जाणारा वेळ वाचेल आणि गरजूंना आपत्कालीन मदतही लवकर मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
--इन्फो--
६० कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण
ग्रामीण पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचेही आदेश दिले आहे. पहिल्या टप्प्यात ६० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सध्या मुख्यालयात सुरू आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपत्कालीन मदतीचे धडे दिले जाणार आहेत. आपत्कालीन मदतीचा कॉल झाल्यानंतर कशाप्रकारे प्रतिसाद द्यावयाचा आहे, याबाबत प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन केले जात आहे.
--इन्फो--
पोेलीस मदतीसाठी डायल करा ११२
आपत्कालीन परिस्थितीत पोलीस मदत मिळविण्यासाठी आता जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून थेट ११२ हा नवा टोल-फ्री क्रमांक डायल करावा. यानंतर अवघ्या दहा मिनिटांच्या आतमध्ये संबंधितांना घटनास्थळी मदत उपलब्ध होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
यापूर्वी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून पोलीस मदत मागितली जात होती. यावेळी अनेकदा कधी क्रमांक व्यस्त तर कधी तांत्रिक कारणांमुळे लागत नसल्याच्याही तक्रारी येत होत्या. आता मात्र ११२ क्रमांकावरून थेट पोलीस मदत अवघ्या दहा मिनिटांत मिळणार आहे.
---इन्फो--
सहा चारचाकी मिळाल्या
ग्रामीण पोलिसांना नव्याने ५ बोलेरो आणि १ टीयुव्ही अशी सहा नवीन वाहने मिळाली आहेत. येत्या काही दिवसांत दुचाकीही मिळण्याची शक्यता आहे, तसेच चारचाकी वाहनांच्या संख्येतही वाढ होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
---
--कोट--
आपत्कालीन मदतवाहिनी म्हणून शासनाकडून ११२ हा टोल-फ्री संयुक्त क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावरून अग्निशमन, पोलीस, रुग्णवाहिका अशा सर्वांनाच ‘कॉल’ जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस दलही जिल्ह्यातील नागरिकांना ही सेवा सुरळीत आणि प्रभावी देण्यासाठी सज्ज होत आहे. सध्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण सुरू आहे. लवकरच ही सेवा कार्यान्वित होणार असून, नव्याने वाहनेही पोलीस दलाला मिळाली आहेत.
- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक.
---
पॉइंटर्स :
जिल्ह्यातील पाेलीस ठाणे : ४०
पोलीस अधिकारी- २१८
कर्मचारी- ३४००
---
फोटो आर वर : डमी फॉरमेट २४स्टार७४० नावाने सेव्ह आहे.
--
पोलीस वाहनांचा फोटो एनएसके वर मेल करण्यात येईल.