एकांकिका,नृत्य,गायनाची धम्माल..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 02:41 PM2020-03-03T14:41:26+5:302020-03-03T14:42:34+5:30
पिंपळगाव बसवंत प्रतिनिधी :- फॅशन शो, कवायती ,भरतनाट्यम ,मुली वाचवा असे सामाजिक संदेश देणारे नाटकयासहनृत्य ,कला व गोड स्वरातून गुणगुणनारा आवाज , लोकिप्रय हिंदी मराठी गीत ,समाजप्रबोधनाच्या नाटिका अशा एका पेक्षा एक बढकर कलागुणांनी पिंपळगावचा रेम्बो फेस्टिवल महोत्सव सोहळा पिंपळगाव हायस्कुल च्या प्रांगणात रंगला होता. निफाड एज्युकेशन सोसायटीच्या कन्या विद्यालय ,पिंपळगाव हायस्कूल व बी.पी.पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्र मआयोजितकरण्यात आला होता.
या कार्यक्र माचे उद्घाटन भुजबळ नॉलेज सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक शेफाली भुजबळ यांच्या हस्ते झाले. तर विलास शिंदे ,पोलिस उपअधीक्षक प्रभाकर रायते यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्र माची सुरु वात समिक्षा मोरे हिच्या गणेश वंदन सुरवात झाली. या रेंबो फेस्टिव्हल मध्ये शंकरा शंकरा ,शिवतांडव, क्लासिक डान्स ,मर्द मावळा ,शिव राज्याभिषेक तसेच अन्य काही गीतांवरील गाण्यांना उपस्थितांनी डोक्यावर घेतले .
प्राध्यापक सुनील वाघ यांनी सादर केलेल्या किशोर कुमार यांच्या सदाबहार गीतांनार सिकांची चांगलीच दाद मिळाली
यावेळी निफाड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव ,उपाध्यक्ष संजय मोरे ,माजी सरपंच भास्करराव बनकर , अविनाश देशमाने,मिलिंद चव्हाण, रामाराव बनकर ,सोमनाथ मोरे,,उद्धव निरगुडे, राजेश पाटील ,नानासाहेब बोरस्ते ,बाळासाहेब बनकर ,डॉ. सुनील जाधव ,विपुल पगारिया,,स्मिता जाधव ,भूषण पारक गणेश बनकर,सतीश मोरे ,राहुल बनकर,नितीन जाधव आदी उपस्थित होते या कार्यक्र माच्या यशस्वीसाठी शिक्षण अधिकारी उत्तमराव जाधव ,प्राचार्य दिनेश अनारसे ,मुख्याध्यापक ए.जे.मोरे ,मुख्याध्यापिका मीना अहरे ,समीर जाधव ,मीनाक्षी जाधव ,नितीन डोखळे , शिवानी कापडी,हितेश गांगुर्डे आदींनी परिश्रम घेतले.