एकलहरे ग्रामस्थ  मोकाट कुत्र्यांनी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:52 PM2018-12-26T23:52:42+5:302018-12-27T00:36:10+5:30

येथील एकलहरेगाव, सिद्धार्थनगर, हनुमाननगर, कन्नडवाडी व सामनगाव परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने रहिवासी, महिला, शालेय विद्यार्थी व कामगारांना जीव मुठीत धरून रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

 Single-faced villagers stray dogs | एकलहरे ग्रामस्थ  मोकाट कुत्र्यांनी त्रस्त

एकलहरे ग्रामस्थ  मोकाट कुत्र्यांनी त्रस्त

Next

एकलहरे : येथील एकलहरेगाव, सिद्धार्थनगर, हनुमाननगर, कन्नडवाडी व सामनगाव परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने रहिवासी, महिला, शालेय विद्यार्थी व कामगारांना जीव मुठीत धरून रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.  एकलहरे गेट नंबर दोनपासून चारी नंबर एकच्या बस स्टॉपपर्यंतच्या परिसरातील सिद्धार्थनगर, हनुमाननगर, कन्नडवाडी येथे १५ ते २० भटके कुत्रे कायम ठाण मांडून बसलेले असतात. वाहनधारकांच्या मागे हे कुत्रे पाठलाग करत असल्याने दुचाकी वाहनधारकांची तारांबळ उडते. कन्नडवाडी समोरील रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या वाहनांचा हे कुत्रे हमखास पाठलाग करतात. या कुत्र्यांचा त्रास टाळण्यासाठी वाहनधारक एकलहरे वसाहतीमधूनच जाणे पसंत करतात. गेल्या महिनाभरात येथील कुत्र्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली असून, हे कुत्रे आले कुठून असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे रहिवासी, महिला, मुले एकटेदुकटे घराबाहेर पडणे टाळू लागले आहेत. तर रात्री- अपरात्री कामावर येणारे व घरी जाणाºया कामगारांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकलहरे वीज केंद्र वसाहतीच्या भिंतीलगतच्या झाडाझुडपातून हे मोकाट कुत्रे ठाण मांडून बसत असल्याने येणाºया-जाणाºयांना सहसा दिसून येत नाहीत. कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे आत्तापर्यंत लहान-मोठे अपघातही झालेले आहेत. नाशिक महापालिकेने पकडलेले मोकाट कुत्रे एकलहरे जवळील किर्लोस्करच्या टेकडीलगत सोडले जातात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याच मोकाट कुत्र्यांचा त्रास एकलहरे व सामनगावच्या रहिवाशांना सोसावा लागतो. सामनगाव परिसरातही मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कुत्रे रात्रभर परिसरातील रस्त्यांवर व शेतातील पिकांमध्ये धुडगूस घालून शेतमालाचे नुकसान करतात, अशी तक्रार शेतकºयांनी केली आहे.
एकलहरे वीज केंद्र वसाहतीच्या भिंतीलगतच्या झाडाझुडपातून हे मोकाट कुत्रे ठाण मांडून बसत असल्याने येणाºया-जाणाºयांना सहसा दिसून येत नाहीत. कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे आत्तापर्यंत लहान-मोठे अपघातही झालेले आहेत.

Web Title:  Single-faced villagers stray dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.