सिन्नरला नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 06:15 PM2018-12-15T18:15:27+5:302018-12-15T18:16:13+5:30
प्रलंबित मागण्यांसाठी नगरपरिषदेच्या कर्मचाºयांनी परिषदेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. त्यानंतर प्रलंबित मागण्यांचे निवेदन कार्यालयीन निरीक्षक विष्णू क्षत्रिय यांना देण्यात आले.
सिन्नर : प्रलंबित मागण्यांसाठी नगरपरिषदेच्या कर्मचाºयांनी परिषदेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. त्यानंतर प्रलंबित मागण्यांचे निवेदन कार्यालयीन निरीक्षक विष्णू क्षत्रिय यांना देण्यात आले.
नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक भाटजिरे, रवींद्र देशमुख, नीलेश बाविस्कर यांच्या नेतृत्त्वाखाली कर्मचाºयांनी प्रवेशद्वारात धरणे धरले. राज्यातील नगरपालिका व नगरपंचायती मधील कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार, अनुकंपाधारक यांच्या प्रलंबित मागण्यांची पुर्तता न झाल्यामुळे त्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्याकरिता १ जानेवारी २०१९ पासून बेमुदत कमबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रलंबित मागण्या संदर्भात संघटनेमार्फत बरेच आंदोलने केली आहेत. पाठपुरावा केला जात आहे. परंतु नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचाºयांच्या मागण्याची पुर्तता होण्यासंदर्भात नेहमीच दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सदर कारणाने राज्यातील सर्व संघटनाचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य नगरपालिका कर्मचारी व संवर्ग कर्मचारी कामगार संघटना संघर्ष समितीने निर्णय घेतल्याप्रमाणे धरणे आंदोलन करण्यात आले.
त्यानंतरही मागण्या मान्य न केल्यास सर्वच कर्मचारी दि २९, ३० व ३१ डिसेंबर ला काळ्या फिती लावून काम करतील आणि दि. १ जानेवारी २०१९ पासून बेमुदत कामबंद करणार आहेत. या आंदोलनाची नोटीस निवेदनाद्वारे देण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा निदवेनता देण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास नगरपरिषद मधील कर्मचारी जबाबदार राहणार नसल्याचे म्हटले आहे. त्यास प्रशासन व शासन जबाबदार राहणार असल्याचे म्हटले आहे.
यावेळी अशोक कटारे, सतिश शिंदे, कमलाकर ओतारी, भीमराव संसारे, विष्णू हाडके, नीलेश चव्हाण, राजेंद्र आंबेकर, कैलास शिंगोटे, दामु भांगरे, दिलीप गोजरे, मनिलाल चौरे, मंगेश आहेर, अनिल जाधव, जावेद सैय्यद, ज्ञानेश्वर घेगडमल, दिपक गायकवाड, दीपक पगारे, ताहिर शेख, फिकरा उगले, कल्पेश उगले, राहुल आहिरे, सचिन वारु ंगसे, गोरख वाघ, बाळासाहेब भोळे, अलका पावडे, शैलेजा जाधव, वृषाली जाधव, हसन शेख, प्रकाश घेगडमल आदी उपस्थित होते.