सिन्नरला ड्रोनद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते शुभारंभ : मोजणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:32 PM2018-02-09T23:32:16+5:302018-02-10T00:31:11+5:30
सिन्नर : सिन्नर शहर आज महत्त्वाच्या टप्प्यावर आले आहे. शहरातील मालमत्ता मोजण्याचे ड्रोन सर्वेक्षणाचे ऐतिहासिक काम होत आहे. या नोंदीवरच पुढील अनेक वर्षे नगरपालिकेचे काम चालणार आहे.
सिन्नर : सिन्नर शहर आज महत्त्वाच्या टप्प्यावर आले आहे. शहरातील मालमत्ता मोजण्याचे ड्रोन सर्वेक्षणाचे ऐतिहासिक काम होत आहे. या नोंदीवरच पुढील अनेक वर्षे नगरपालिकेचे काम चालणार आहे. सर्वेक्षण आणि मूल्यांकन योग्यरीतीने व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सर्वेक्षणामुळे प्रत्येकाला न्याय मिळेल व अन्यायकारक कर आकारणी दूर होईल, असा विश्वास आमदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केला.
ड्रोनद्वारे शहरातील मालमत्तांच्या सर्वेक्षण कामाचा शुभारंभ आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार वाजे यांच्या व नगरपालिकेच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये ग्रीन जिमचे लोकार्पण व संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन वाजे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद चोथवे, कृष्णाजी भगत, अॅड. शिवाजी देशमुख, हेमंत नाईक, गटनेते हेमंत वाजे, सोमनाथ वाघ, गौरव घरटे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, नगरसेवक पंकज मोरे यांच्यासह नगरपालिका पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. नगरसेवक गोविंद लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शिवाजी कुºहाडे, अॅड. शिवाजी देशमुख, व्यंकटेश दुर्वास, शीतल सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक शैलेश नाईक, बाळासाहेब उगले, सोमनाथ पावसे, रुपेश मुठे, गीता वरंदळ, सुजाता भगत, विजया बर्डे, श्रीकांत जाधव, सुजाता तेलंग, ज्योती वामने, नलिनी गाडे, निरुपमा शिंदे यांच्यासह नगरपालिका पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले.