सिन्नरला २१ फुटी गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 11:13 PM2019-04-05T23:13:03+5:302019-04-05T23:30:13+5:30
सिन्नर : दरवर्षाप्रमाणे गुढीपाडव्यास शोभायात्रा काढून नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सिन्नर सांस्कृतिक मंडळाकडून तयारी पूर्ण करण्यात आली असून, सकाळी ६.३० वाजता शिवाजी चौकात २१ फुटी गुढी उभारून शोभायात्रेस प्रारंभ होणार आहे.

शोभायात्रेत सर्वांनी भारतीय वेशात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, हेमंत वाजे, प्रकाश नवसे, प्रा. राजाराम मुंगसे, प्रा. जावेद शेख, शंतनू कोरडे यांच्यासह वंदे मातरम् संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. शोभायात्रा दरवर्षापेक्षा देखणी व्हावी या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. पुलवामाच्या जखमा ताज्या असल्याने त्याची आठवण व शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून त्याविषयीचा चित्ररथही शोभायात्रेत ठेवण्यात येणार आहे.