सिन्नर आगारात मराठी भाषा गौरवदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 05:38 PM2019-02-28T17:38:03+5:302019-02-28T17:38:20+5:30

सिन्नर : येथील बसस्थानकात मराठी भाषा गौरवदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.

Sinnar Agaraya Marathi language Gauravadra Abhayapra | सिन्नर आगारात मराठी भाषा गौरवदिन उत्साहात

सिन्नर आगारात मराठी भाषा गौरवदिन उत्साहात

googlenewsNext

सिन्नर : येथील बसस्थानकात मराठी भाषा गौरवदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगारप्रमुख भूषण सूर्यवंशी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बही:शाल शिक्षण मंडळाचे अधिव्याख्याते डॉ. श्यामसुंदर झळके होते. झळके यांनी आपली मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी तसेच अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज प्रतिपादन केली. मराठी भाषेला वैभव तसेच प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी जेष्ठ साहित्यीक, नाटककार, समीक्षक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रज यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी अशा माय मराठीचा आपणा सर्वांना सार्थ अभिमान आहे. दैनंदिन जीवनात मराठी वापर आपण स्वत: पासून केल्यास खऱ्या अर्थाने मराठी राजभाषा होऊ शकते. राज्यकर्त्यांनीही त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे डॉ.झळके यांनी सांगितले. आगरप्रमुख भूषण सूर्यवंशी यांनी गेल्या चार वर्षांपासून मराठी भाषादिन राज्य परिवहन मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला.

Web Title: Sinnar Agaraya Marathi language Gauravadra Abhayapra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी