सिन्नरला १०० टक्के मतदार नोंदणीचे उद्दीष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 07:04 PM2018-09-11T19:04:14+5:302018-09-11T19:04:47+5:30
आगामी २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. सिन्नर तालुक्यात १०० टक्के मतदार नोंदणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तालुकास्तरावर स्वीप समितीची स्थापना करण्यात आली आहे.
सिन्नर : आगामी २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे.
सिन्नर तालुक्यात १०० टक्के मतदार नोंदणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तालुकास्तरावर स्वीप समितीची स्थापना करण्यात आली आहे. १ सप्टेंबरला प्रारुप मतदार याद्या १ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार तालुक्यात २ मतदान केंद्रांची वाढ झाली असून आता ३०९ केंद्र असतील. २ लाख ८१ हजार मतदार संख्या असून नोंदणी न केलेल्या मतदारांचा शोध घेवून १०० टक्के नोंदणी करण्याचे उद्दीष्टही निवडणूक शाखेने ठेवले आहे. या उपक्रमात विभागनिहाय जबाबदाºयाही देण्यात आल्या आहेत. त्यातच याद्यांच्या दुरुस्तीचे कामही सुरु आहे. दुबार नावे, मयत व स्थलांतरीत मतदारांपैकी ४ हजार ५०० नावेही यादीतून वगळण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार नितीन गवळी, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार नरेंद्र वाघ यांनी दिली. शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विविध विभागांचे अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी व राजकीय प्रतिनिधींच्याही बैठका घेण्यात आल्या आहेत. मतदार नोंदणी न केलेल्यांनी तातडीने नोंदणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जनजागृतीसह मतदार नोंदणी करण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. महिला, अपंग यांची पूर्णत: नोंदणी करण्यावरही भर देण्यात आला आहे.
स्वीप समितीची स्थापना दीपमाला चौरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वीप समितीची स्थापना करण्यात आली आहे. सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ, सहाय्यक निबंधक संदीपकुमार रुद्राक्ष, बालविकास प्रकल्प अधिकारी एल. डी. गवळी, एफ ई. राऊत, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार, कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, सचिव नितीन गवळी हे समितीत असणार आहेत.