सिन्नर बाजार समिती वाटणार १००० राशन किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:08 PM2020-04-15T23:08:34+5:302020-04-15T23:08:55+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरल्याने संपूर्ण देशात २१ दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. या बंदमुळे मजुरांना काम मिळेणासे झाले आहे. हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब नागरिकांच्या खाण्यापिण्याचे अतोनात हाल होत आहेत. या व अशा अनेक समस्यांचा विचार करता सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदीदार व्यापारी यांचे मदतीतून गरजूंना १००० राशन किट वाटण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
सिन्नर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरल्याने संपूर्ण देशात २१ दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. या बंदमुळे मजुरांना काम मिळेणासे झाले आहे. हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब नागरिकांच्या खाण्यापिण्याचे अतोनात हाल होत आहेत. या व अशा अनेक समस्यांचा विचार करता सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदीदार व्यापारी यांचे मदतीतून गरजूंना १००० राशन किट वाटण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
मंगळवारी (दि. १४) बाजार समितीचे सभापती विनायक तांबे यांच्या हस्ते गरजूंना किराणा, धान्य मोफत वितरित करण्यात आले. मजूर, परप्रांतीय कामगार, समाज्यातील शोषित व दुर्लक्षित घटक यांच्यासाठी १००० राशन किटचे टप्प्याटप्प्याने यापुढे वाटप होणार असल्याचे सभापती तांबे यांनी सांगितले. त्याची प्राथमिक सुरुवात मंगळवारी बाजार समितीचे आवारात एका कुटुंबाला किमान १५ दिवस पुरेल एवढा किराणा व धान्यभुसार मालाचे ५० किटचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी संचालक सुनील चकोर, बाळकृष्ण चकोर, अनिल कलंत्री, बाबुशेठ लढ्ढा, दिलीप खिवंसरा, विजय तेलंग, पप्पू गोळेसर, सुरेश कलंत्री, महेश पारख, जयनारायण कलंत्री, एस. आ. पाटोळे, श्रीमती पी. व्ही. गवळी आदी उपस्थित होते.
अनिल पन्हाळे, उत्तम पालवे, रविराज बोºहाडे, निवृत्ती तुपे, शरद शिरसाठ, पांडुरंग शिरसाठ, बाजार समितीचे सचिव विजय विखे, उपसचिव आर. एन. जाधव, ए. सी.शिंदे, पी. आर. जाधव, एस. के. चव्हाणके, आर. जे. डगळे, एस. ए. बाळदे, एस. डी. चव्हाण, व्ही. एस. कोकाटे, आर. आर. उगले. एस. व्ही. वाळुंज, व्ही. बी. मोरे, डी. आर. पाटोळे,