बालनाट्य महोत्सवात सिन्नर केंद्र प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 06:14 PM2018-10-02T18:14:49+5:302018-10-02T18:15:46+5:30
या बालनाट्य महोत्सवात कामगार कल्याण केंद्र सिन्नरच्या ‘अकलेने लावली राज्याची वाट’ या नाटकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ललित कला भवन सिडकोच्या ‘दृष्टिकोन’ व कामगार कल्याण वसाहत विहितगावच्या ‘वाटाड्या’ या नाटकांना
नाशिक : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाशिक गट कार्यालयाच्या वतीने आयोजित बालनाट्य महोत्सवात सिन्नर केंद्राच्या ‘अकलेने लावली राज्याची वाट’ या नाटकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
सिडकोतील ललित कला भवनमध्ये झालेल्या या बालनाट्य महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र ढवळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामोदय विद्यालयाचे प्राचार्य माणिक भदाणे, सहायक कल्याण आयुक्त भावना बच्छाव, परीक्षक नूपुर सावजी, पीयूष नाशिककर, सिद्धार्थ आहिरे उपस्थित होते. या नाट्य महोत्सवात एकलहरे, विहितगाव, देवळालीगाव, नेहरूनगर, बुधवार पेठ, सिडको, सातपूर, पिंपळगाव, सिन्नर येथील नाट्यसंघांनी भाग घेतला.
या बालनाट्य महोत्सवात कामगार कल्याण केंद्र सिन्नरच्या ‘अकलेने लावली राज्याची वाट’ या नाटकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ललित कला भवन सिडकोच्या ‘दृष्टिकोन’ व कामगार कल्याण वसाहत विहितगावच्या ‘वाटाड्या’ या नाटकांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांंकाचे पारितोषिक मिळाले. एकलहरे केंद्राच्या ‘तेनालीरामा’ व देवळाली गावच्या ‘ड्रायव्हर’ या नाटकांना उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय पारितोषिक मिळाले. विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक भावना बच्छाव यांनी तर आभार मंजुळा परदेशी यांनी मानले.
चौकट====
वैयक्तिक पारितोषिके अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय. (कंसात नाटकाचे नाव)
अभिनय मुले- प्रथमेश जाधव (ड्रायव्हर), सर्वेश बोडके (अकलेने लावली राज्याची वाट), प्रज्वल देशपांडे (स्वच्छ भारत अभियान), अभिनय मुली- दुर्वाक्षी पाटील (ड्रायव्हर), स्वरा कुलकर्णी (दृष्टिकोन), तन्वी देवरे (अकलेने लावली राज्याची वाट), दिग्दर्शन - मनीषा एकबोटे (अकलेने लावली राज्याची वाट), रामेश्वर कापसे (दृष्टिकोन), सुषमा दुसाने (वाटाड्या).