सिन्नर शहर आणि उपनगरे प्रतिबंधित क्षेत्र घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 09:40 PM2020-07-21T21:40:26+5:302020-07-22T01:01:22+5:30

सिन्नर : तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येने चारशेचा टप्पा पार केल्याने चिंता वाढली आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत ४ आॅगस्टपर्यंत सिन्नर शहर व उपनगरे संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Sinnar city and suburbs declared a restricted area | सिन्नर शहर आणि उपनगरे प्रतिबंधित क्षेत्र घोषित

सिन्नर शहर आणि उपनगरे प्रतिबंधित क्षेत्र घोषित

Next

सिन्नर : तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येने चारशेचा टप्पा पार केल्याने चिंता वाढली आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत ४ आॅगस्टपर्यंत सिन्नर शहर व उपनगरे संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. शहर व तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊनची गरज व्यापारी असोसिएशनने व्यक्त केली होती. मात्र, शासनाची भूमिका अनलॉकची असल्याने प्रशासनाने या निर्णयाचे समर्थन केले नव्हते.
तथापि, सोमवारी सायंकाळी एकाच दिवसात ६३ रुग्ण आढळल्याने चिंता वाढली. मंगळवारी व्यापारी प्रतिनिधींची बैठक बोलावून ४ आॅगस्टपर्यंत सर्व दुकाने बंद
ठेवण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी पठारे व तहसीलदार कोताडे यांनी केले.
नगराध्यक्ष किरण डगळे तसेच असोसिएशनच्या वतीने मनोज भगत, मनोज भंडारी, सागर गुजर, नामदेव लोणारे, राजेंद्र देशपांडे, कांताराम यांनी भूमिका मांडली व प्रशासनाच्या निर्णयास पाठिंबा दिला. बंदची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी पोलीस दल गस्त घालणार आहे.
दवाखाने, औषध दुकाने, दूध व व शेतीविषयक दुकाने वगळता दारू दुकानासह सर्व प्रकारची आस्थापने बंद ठेवण्यात येणार आहेत. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दुपारनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने गावात फिरून नियम पाळण्याच्या सूचना दिल्या.
------------------
तीन किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित
वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे सिन्नर नगरपालिका क्षेत्राचा ३ किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित म्हणून (कंटेन्मेंट झोन) घोषित करण्यात आला असून, जवळचा ५ किलोमीटरचा परिसर बफर झोन राहणार असल्याची अधिसूचना उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांनी प्रसिद्ध केली आहे. या परिसरात प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू असलेले सर्व नियम काटेकोरपणे अंमलात आणले जाणार असल्याचे तहसीलदार राहुल कोताडे यांनी सांगितले. प्रतिबंधक अधिकारी म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चांदवड तालुक्यात दहा नव्या रुग्णांची वाढ
चांदवड तालुक्यात रविवारी (दि.२१) सायंकाळी १० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या दोन दिवसात तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १९ वर पोहोचली आहे. त्यात वडाळीभोई येथील रुग्णांच्या संपर्कातील तीन महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. धोंडगव्हाण येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मेसनखेडे खुर्द येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील २० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, २१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
फुलेनगर येथील २७ वर्षीय पुरु षास चांदवड येथे दाखल केले होते. आॅक्सिजन कमी असल्याने तीन दिवसांपूर्वी नाशिक सामान्य रुग्णालय दाखल करण्यात आले. तेथे स्वॅब घेण्यात आला. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, नाशिक येथे खासगी नोकरी व रहिवासी असलेले शिंगवे येथील २५ वर्षीय पुरुष, बोपाणे येथील २० वर्षीय पुरुष व धोंडगव्हाण येथील रशियास्थित २२ वर्षीय पुरुष बाधित ठरला आहे. या चार रुग्णांसह वडाळीभोई येथील पाच जणांवर चांदवड डीसीएचसीमध्ये उपचार सुरु आहेत.
वडाळीभोई येथील ४० वर्षीय व्यक्ती ओझर येथील पेट्रोलपंपावर कामाला आहे. सदर रु ग्णाच्या कुटुंबातील चार महिला व एक पुरुष असे पाचजण बाधित ठरले असून, अन्य आठ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Web Title: Sinnar city and suburbs declared a restricted area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक