सिन्नर महाविद्यालयाची अवयवदान फेरी
By admin | Published: September 2, 2016 12:10 AM2016-09-02T00:10:17+5:302016-09-02T00:10:27+5:30
सिन्नर महाविद्यालयाची अवयवदान फेरी
सिन्नर : येथील सिन्नर महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत महा अवयवदान अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तत्पूर्वी सिन्नर शहरातून अवयवदान फेरी काढण्यात आली.
सकाळी दहा वाजता प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांच्या हस्ते
फेरीस प्रारंभ करण्यात आला.
फेरीत राष्ट्रीय सेवा योजनेचे निवडक शंभर स्वयंसेवकांसह रासेयो प्रमुख डॉ. गणेश पाटील, ललीत कळसकर, श्रीमती पी. डी. गरुड, सुनील भागवत सहभागी झाले होते. फेरीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी रक्तदान हेच जीवनदान, नेत्रदान दृष्टीदान, हृदयदान सर्वश्रेष्ठ दान, अवयवदान हेच जीवनदान आदी घोषणा दिल्या.
फेरीनंतर सिन्नर महाविद्यालयात डॉ. योगेश कुलथे, चंद्रशेखर बर्वे यांनी अवयवदान या विषयावर मार्गदर्शन केले. व्यासपीठावर नगराध्यक्ष आश्विनी देशमुख, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, उपनगराध्यक्ष संजय नवसे, आरोग्य सभापती उज्ज्वला खालकर, आरोग्य अधिकारी रवि देशमुख, प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, रासेयो प्रमुख गणेश पाटील, उपप्राचार्य त्र्यंबक खालकर आदि उपस्थित होते.यावेळी स्वच्छ भारत-स्वस्थ भारत अभियानांतर्गत सिन्नर नगरपालिका व रासेयोच्या स्वयंसेवकांनी सिन्नर महाविद्यालयात स्वच्छता अभियान राबविले. परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात आली. (वार्ताहर)