सिन्नर महाविद्यालयातील छात्राची भारतीय सेनेत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 05:40 PM2019-03-07T17:40:21+5:302019-03-07T17:40:35+5:30
सिन्नर : येथील गुरूवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली.
सिन्नर : येथील गुरूवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली.
राष्ट्रीय छात्र सेना ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी सरंक्षण व नागरी सेवकांसाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे. देशातील बहुतेक शाळा व महाविद्यालयामधून ही योजना राबविली जाते. राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून सैन्याविषय आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याचा देशाप्रती आदर, निष्ठा, राष्ट्रप्रेम असलेले साहसी युवक तयार करणे हा प्रमुख उद्देश आहे. या उदात्त हेतूने सिन्नर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे युनिट कार्यरत असते.
सिन्नर तालुका हा दुष्काळजन्य परिस्थितीला सातत्याने सामोरे जातो. अशा परीस्थित सिन्नर महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षण पूर्ण करून मोठया संख्येने भारतीय सेनेच्या निवड प्रक्रि येत यश संपादन करतात, ही एक उल्लेखनीय बाब आहे. सुदर्शन बोरसे याची ‘इंडियन नेव्ही मध्ये तसेच पनवेल येथे पार पडलेल्या सैन्य भरती मेळाव्यात महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या १४ कॅडेट्स आणि इतर विद्यार्थ्यांची निवड झाली.