सिन्नरला शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 03:18 PM2020-06-24T15:18:27+5:302020-06-24T15:44:55+5:30
सिन्नर: शहरातील विजय नगर परिसरातील सोनवणे मळा वास्तव्यास असलेल्या 13 वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरात सिलींग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.
सिन्नर: शहरातील विजय नगर परिसरातील सोनवणे मळा वास्तव्यास असलेल्या 13 वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरात सिलींग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.
सायली पुरु षोत्तम जाधव (13) रा. सोनवणे मळा, विजय नगर, सिन्नर असे या मुलीचे नाव आहे. याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, विजय नगरमधील सोनवणे मळा येथे पुरु षोत्तम जाधव हे कुटूंबियांसह वास्तव्यास असून ते शहरातील कापड दुकानात कामाला आहेत तर पत्नी माळेगाव येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात कामाला असून एक मुलगा व एक मुलगी असे चौकोनी कुटूंब असलेल्या जाधव यांच्या लग्नाच्या वाढिदवशीच अल्पवयीन मुलीने जीवनयात्रा संपविल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी सकाळी सात वाजता सायलीची आई कंपनीत कामावर गेली तर वडील पुरु षोत्तम जाधव सकाळी साडेनऊ वाजता कापड दुकानात कामाला गेले. निघताना सायलीने विडलांना सायंकाळी लग्नाचा वाढिदवस असल्याने ‘आईस केक’ आणावयासही सांगितले होते. आईवडील दोघेही कामावर गेल्यानंतर सायली घरी एकटीच होती. तीने घरातील सर्व कामे आवरु न घेत घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने शेजारी वास्तव्यास असलेल्या मिहलेने नष्ट्यासाठी केलेला पदार्थ सायलीला देण्यासाठी जाधव यांच्या घराचा लोटलेला दरवाजा उघडला असता समोर पंख्याला लटकेल्या अवस्थेत सायली दिसल्यावर तीने आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांनी सायलीचे वडील जाधव यांना भ्रमणध्वनीवरु न घटनेची माहिती दिली. अवघ्या अर्धातासापूर्र्वी अगदी उत्साहात कामाला आलेल्या विडलांना मुलीने आत्महत्या केल्याचे समजताच त्यांनी लागलीच घरी धाव घेतली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने सायलीला खाली उतरु न घेत उपचारार्थ शहरातील खासगी रु ग्णालयात घेऊन गेले. तथापि, उपचारांपुर्वीच तीची प्राणज्योत मालवली होती. घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना कळविल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. बी. रसेडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ यांनी घटनास्थळी जात मृतदेह शवविच्छेदनासाठी नगरपालिका दवाखान्यात पाठविला. दरम्यान, सायलीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत सिन्नर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास रामदास धुमाळ करत आहेत.