सिन्नरला शिवसंपर्क अभियानाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:11 AM2021-07-21T04:11:32+5:302021-07-21T04:11:32+5:30
सिन्नर : गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या शिवसंपर्क अभियानाचा समारोप येथे झाला. आगामी निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ...
सिन्नर : गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या शिवसंपर्क अभियानाचा समारोप येथे झाला. आगामी निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भगवा फडकविण्याचा निर्धार शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी केला. सिन्नर तालुक्यातील दोन दिवसीय शिवसंपर्क अभियानाच्या समारोप रविवारी नर्मदा लॉन्सवर आयोजित बैठकीत करण्यात आला. व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे, जिल्हा उपप्रमुख राहुल ताजनपूरे, तालुकाध्यक्ष सोमनाथ तुपे, नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, शैलेश नाईक, प्रमोद चोथवे, विजय जाधव, उदय गोळेसर, दीपक खुळे यांच्यासह शिवसेना नगरसेवक उपस्थित होते. तळागाळापासून संघटना मजबूत पाहिजे, तेव्हाच सर्व सत्ता हस्तगत करता येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील मावळ्यांची चांगली मोट बांधली होती. त्यांच्याकडे जिवाला जीव देणारी माणसे होती. त्यामुळे त्यांना स्वराज्य निर्माण करता आले. शिवसैनिक फुटू कसा शकतो? असा प्रश्न उपस्थित करत गद्दारी करणाऱ्यांच्या कानाखाली काढा असा सल्ला करंजकर यांनी दिला. किरण डगळे, देवा सांगळे, पिराजी पवार, राहुल ताजनपुरे, किरण खाडे, दीपक खुळे यांनी मनोगत व्यक्त केले. किरण मिठे यांनी सूत्रसंचालन केले. गौरव घरटे यांनी आभार मानले.
-----------------
माझे नाही पक्षाचे नुकसान : राजाभाऊ वाजे निवडणुकीत मी पडलो म्हणून माझे नुकसान झाले नाही, पण पक्षाचे मात्र मोठं नुकसान झाले असल्याचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत आपला पराभव कसा झाला हे सर्वांना माहिती आहे, त्याची सल प्रत्येकाच्या मनात आहेच. कोरोना महामारीच्या काळात अनेक नेते घरात बसलेले होते. तेव्हा मात्र, शिवसैनिक मदतीसाठी रस्त्यावर होता. रुग्णांना रेमडिसव्हर, ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होता. तेव्हा विरोधक मात्र घाणेरडे राजकारण करत होते, असे उदय सांगळे यांनी सांगितले.
--------------------
सिन्नर येथे शिवसंपर्क अभियानाच्या समारोपप्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर. व्यासपीठावर राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, राहुल ताजनपुरे, किरण डगळे, हेमंत वाजे, सोमनाथ तुपे यांच्यासह पदाधिकारी. (१९ सिन्नर शिवसेना)
190721\471319nsk_13_19072021_13.jpg
१९ सिन्नर शिवसेना