सिन्नरला म्हाडाचा फ्लॅट सिस्टीम प्रकल्प राबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:18 AM2021-09-05T04:18:26+5:302021-09-05T04:18:26+5:30

सिन्नर : शहरातील तसेच तालुक्यातील अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी शहरात म्हाडा अंतर्गत वन रूम किचन फ्लॅट सिस्टीम ...

Sinnar demanded to implement MHADA's flat system project | सिन्नरला म्हाडाचा फ्लॅट सिस्टीम प्रकल्प राबविण्याची मागणी

सिन्नरला म्हाडाचा फ्लॅट सिस्टीम प्रकल्प राबविण्याची मागणी

Next

सिन्नर : शहरातील तसेच तालुक्यातील अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी शहरात म्हाडा अंतर्गत वन रूम किचन फ्लॅट सिस्टीम प्रकल्प राबविण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली.

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरकुटे यांनी यासंदर्भातील निवेदन गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांना दिले. माळेगाव आणि मुसळगाव येथे सुरू असलेली औद्योगिक वसाहत, शहराशेजारून जाणारा समृद्धी महामार्ग, प्रस्तावित सुरत-चेन्नई महामार्ग, शिर्डी येथे जाणाऱ्या पायी पालख्या यामुळे सिन्नर शहराचे महत्त्व जगाच्या नकाशावर अधोरेखित झाले आहे. नाशिक शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिन्नरमध्ये इंडिया बुल्स आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल याशेजारी शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासासाठी जागा प्रस्तावित आहेत. त्या ठिकाणी म्हाडाअंतर्गत वन रूम किचन फ्लॅट सिस्टीम सुरू करावी. सिन्नरचे भूमिपुत्र या नात्याने या प्रकरणात आपण व्यक्तिगत लक्ष घालून हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी विनंती मुरकुटे यांनी आव्हाड यांच्याकडे केली. दरम्यान, या मागणीची आव्हाड यांनी तातडीने दखल घेऊन नाशिक म्हाडाचे सीओ यांना उचित कार्यवाहीसाठी त्वरित अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

फोटो - ०४ सिन्नर म्हाडा

सिन्नरमध्ये म्हाडाअंतर्गत फ्लॅट सिस्टीम राबविण्यासंदर्भात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे.

040921\04nsk_29_04092021_13.jpg

 सिन्नरमध्ये म्हाडा अंतर्गत फ्लॅट सिस्टीम राबवण्या संदर्भात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे.

Web Title: Sinnar demanded to implement MHADA's flat system project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.