बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा सिन्नरला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:40 AM2019-08-31T01:40:44+5:302019-08-31T01:41:07+5:30
तालुक्यातील चंद्रपूर (घोडेवाडी) येथे पोळा सणानिमित्त बैलांना धुण्यासाठी घेऊन गेलेल्या शेतकºयाचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३०) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
सिन्नर : तालुक्यातील चंद्रपूर (घोडेवाडी) येथे पोळा सणानिमित्त बैलांना धुण्यासाठी घेऊन गेलेल्या शेतकºयाचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३०) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
बंडू पुंजा गवारे (४५) हा शेतकरी बैलजोडी घेऊन तलावाकडे गेला होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाय घसरून गवारे बुडाले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने गळ टाकून शोध घेण्यात आला. अग्निशामक दल व जीवरक्षक दलाचे गोविंद तुपे यांना पाचारण करण्यात आले.
जवानांनी पाण्यात शोध घेतला. सुमारे सात तासाच्या प्रयत्नानंतर शेतकरी बंडू गवारे यांचा मृतदेह गळाला लागला. मृतदेह सायंकाळी पाझर तलावातून बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोळ्याच्या दिवशीच बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकºयाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.