सिन्नरला विजेच्या धक्क्याने परप्रांतीयाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 02:56 PM2020-07-11T14:56:39+5:302020-07-11T14:56:56+5:30

विजयनगर परिसरात नवीन कोर्टासमोर विजय रंगनाथ शिंदे यांच्या घराजवळ पाण्याच्या टाकीच्या स्टँडला वेल्डींगचे काम करत असलेल्या

Sinnar dies of electrocution | सिन्नरला विजेच्या धक्क्याने परप्रांतीयाचा मृत्यू

सिन्नरला विजेच्या धक्क्याने परप्रांतीयाचा मृत्यू

Next

सिन्नर : येथील विजयनगर परिसरात पाण्याच्या टाकीच्या स्टँडला वेल्डींग करत असताना विद्युत खांबाच्या वायरचा शॉक लागल्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली. रवी शर्मा, रा. कंठी बयुआ, ता. जि. गोपालगंज, बिहार असे मृत कामगाराचे नाव आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, येथील विजयनगर परिसरात नवीन कोर्टासमोर विजय रंगनाथ शिंदे यांच्या घराजवळ पाण्याच्या टाकीच्या स्टँडला वेल्डींगचे काम करत असलेल्या रवी शर्मा याला विद्युत खांबाच्या वायरचा शॉक लागल्याने तो खाली पडला. त्यास उपचारार्थ नगरपालिका रुग्णालयात दाखल केले असता उपचारांपुर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. रोहीत चिंतामन पगारे, रा. आंबेडकर नगर, सिन्नर यांनी दिलेल्या माहितीवरुन सिन्नर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास रामदास धुमाळ करत आहेत.

Web Title: Sinnar dies of electrocution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.