सिन्नरला महिलांसाठी विविध स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 11:33 PM2020-03-14T23:33:49+5:302020-03-15T00:14:13+5:30
नगर परिषद महिला व बालकल्याण समिती व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सिन्नर नगर परिषद, तळमजला येथे महिलांसाठी रांगोळी, मेहंदी व पाककला स्पर्धा घेण्याचे आयोजन करण्यात आले होते. सिन्नर शहरातील महिलांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदविला.
सिन्नर : नगर परिषद महिला व बालकल्याण समिती व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सिन्नर नगर परिषद, तळमजला येथे महिलांसाठी रांगोळी, मेहंदी व पाककला स्पर्धा घेण्याचे आयोजन करण्यात आले होते. सिन्नर शहरातील महिलांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदविला.
रांगोळी स्पर्धेत पूजा पवार यांना प्रथम क्रमांक, अंजली वर्पे द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक नीलिमा दशपुते यांना मिळाला, तर स्वप्ना मुळीक व मानसी ठाणेकर यांना उत्तेजनार्थ परितोषिक देण्यात आले. पाककला स्पर्धेत श्रद्धा गुजराथी यांना प्रथम क्रमांक, मनीषा धात्रक द्वितीय क्रमांक, विजया देशमुख यांना तृतीय क्रमांक मिळाला, तर चित्रा क्षत्रिय व सुवर्णा आरोटे
यांना उत्तेजनार्थ परितोषिक देण्यात आले.
मेहंदी स्पर्धेत प्रियांका रणमाळे यांना प्रथम क्र मांक, रिदा खान यांना द्वितीय क्र मांक, कांचन कासट
यांना तृतीय क्र मांक मिळाला, तर सलोनी मोरे व मानसी ठाणेकर
यांना उत्तेजनार्थ परितोषिक देण्यात आले. तसेच मिठक फोडणेचा
खेळ यावेळी घेण्यात आला.
बेटी बचाव-बेटी पढावबाबत स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली.
सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात
आले.
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तेजस्विनी हेमंत वाजे, दीपाली चांडक, महिला व बालकल्याण सभापती सुजाता तेलंग यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास स्वयंशक्ती संस्थेच्या संचालक दीपाली चांडक या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. अनिल जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.