कामगार कल्याण केंद्र्च्या भजन स्पर्धेत सिन्नर प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 06:51 PM2018-10-08T18:51:48+5:302018-10-08T18:52:14+5:30
नाशिक: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक गट कार्यालयांतर्गत झालेल्या पुरुष भजन स्पर्धेत सिन्नर केंद्रास प्रथम क्रमांक मिळाला.
या स्पर्धेत सिन्नर, सातपूर, एकलहरे, बुधवारपेठ, सिडको, नेहरुनगर, विहितगाव, देवळालीगाव, ओझर आदी ठिकाणच्या कामगार केंद्रांनी भाग घेतला. स्पर्धेचे परिक्षक म्हणुन चारुदत्त दीक्षित, श्याम दशपुत्रे, नंदकुमार देशपांडे यांनी काम पाहीले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र सिन्नरच्या संघास प्रथम पारितोषिक मिळाले. कामगार कल्याण भवन सातपूरला द्वितीय तर एकलहरे केंद्रास तिसरा क्रमांक मिळाला. उत्तेजनार्थमध्ये प्रथम बुधवारपेठ केंद्र तर दुसरे सातपूर वसाहत केंद्रास मिळाले. उत्कृष्ट तालसंघाचे प्रथम पारितोषिक विहीतगाव वसाहत, द्वितिय नेहरुनगर व तृतीय सातपूर वसाहत मानकरी ठरले. सर्व विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी महंत कृष्णदासजी नागे महाराज होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन प्रेस मजदुर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, सहाय्यक कल्याण आयुक्त भावना बच्छाव होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र नांदे यांनी तर आभार संदिप चव्हाण यांनी मानले.
चौकट-----
वैयक्तिक पारितोषिके पुढील प्रमाणे- उत्कृष्ठ गायक- भारत मांडे (सिन्नर), दत्तात्रेय जाधव (सिडको), मुकुंद कुलकर्णी (सातपूर); उत्कृष्ठ पखवाज,तबला वादक- विनायक कोरे (सातपूर), ज्ञानेश्वर सोनवणे (बुधवार पेठ), सचिन सानप (एकलहरे); उत्कृष्ट हार्मोनियम- भगवंत लेले (सिडको), अर्जुन घोटेकर(सातपूर), विजय जगताप (नेहरुनगर)