सिन्नर-घोटी रस्त्यावर वाहनाच्या धडकेने बिबट्या जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:15 AM2018-03-26T00:15:36+5:302018-03-26T00:15:36+5:30
सिन्नर-घोटी महामार्गावर वाहनाने धडक दिल्याने शनिवारी रात्री बिबट्याला मुकामार लागला. घटनेची माहिती मिळताच तातडीने वनविभागाने रेस्क्यू मोहीम राबवून बिबट्याला ताब्यात घेत त्याच्यावर उपचार केले. उपचारानंतर बिबट्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांनी दिली.
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर वाहनाने धडक दिल्याने शनिवारी रात्री बिबट्याला मुकामार लागला. घटनेची माहिती मिळताच तातडीने वनविभागाने रेस्क्यू मोहीम राबवून बिबट्याला ताब्यात घेत त्याच्यावर उपचार केले. उपचारानंतर बिबट्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांनी दिली. सिन्नर-घोटी महामार्गावर आगासखिंड शिवारात बिबट्याला शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वाहनाने धडक दिल्याने तो रस्त्यावर कोसळला. घटनेची माहिती सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांना देण्यात आली. वनपाल अनिल साळवे, प्रीतेश सरोदे, तानाजी भुजबळ यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मुकामार लागल्याने बिबट्या एकाजागी बसून होता. वनकर्मचाºयांनी गनच्या साह्याने त्याला भूल देऊन ताब्यात घेतले. त्यानंतर शुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी त्याच्यावर उपचार केले. बिबट्या घाबरलेला होता. कोठेही फ्रॅक्चर नव्हते. रविवारी त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, त्याने अन्नही खाल्ल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भणगे यांनी सांगितले. दरम्यान, वनविभाग बिबट्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.