सिन्नर येथे गावाबाहेरील देवी मंदिरात चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 06:18 PM2019-04-25T18:18:21+5:302019-04-25T18:18:43+5:30
ग्रामदेवी असलेल्या येथील गावाबाहेरील भगवती देवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
सिन्नर : ग्रामदेवी असलेल्या येथील गावाबाहेरील भगवती देवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
गावाबाहेरी देवी मंदिरात गाभाऱ्याजवळ मोठी लोखंडी दानपेटी ठेवण्यात आली आहे. चैत्र महिन्यात यात्रोत्सवाचा कालावधी असल्याने दर्शनासाठी भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे दानपेटीत जास्त रक्कम असावी असा अंदाज करुन बुधवारी रात्री चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला.
मंदिराचे पुजारी वसंत तनपुरे व शोभा तनपुरे यांच्या घराला चोरट्यांनी बाहेरुन कडी लावून घेतली. त्यानंतर चोरट्यांनी पहारीच्या सहाय्याने लोखंडी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. दोन मोठी कुलूपे असल्याने चोरट्यांनी दानपेटीचा पत्रा पहारीच्या सहाय्याने फोडून हात जाईल इतके छिंद्र पाडले. मात्र दानपेटी खोल असल्याने चोरट्यांच्या हाताला काही लागले नाही. पहाटे मंदिराचे पुजारी तनपुरे उठल्यानंतर त्यांना घराला बाहेरुन कडी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी फोन करुन शेजारी माहिती दिली.
मंदिरात जावून पाहिल्यानंतर दानपेटी फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
चोरटे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद
अज्ञात दोन चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. हातात लोखंडी पहार घेऊन ते दानपेटी फोडत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले. दानपेटी फोडत असतांना आवाज आला नाही. रात्री दीड वाजेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केल्याचे दिसून येते.