सिन्नरला रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 08:45 PM2020-05-07T20:45:01+5:302020-05-07T23:51:30+5:30
सिन्नर : येथील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय सेवा देणाऱ्या एका ३० वर्षीय तरुण डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सिन्नरकरांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. तालुक्यात सहा जण कोरोनाबाधित झाले आहेत.
सिन्नर : येथील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय सेवा देणाऱ्या एका ३० वर्षीय तरुण डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सिन्नरकरांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. तालुक्यात सहा जण कोरोनाबाधित झाले आहेत.
सिन्नर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता वाढल्याने काळजी वाढली आहे. सिन्नरच्या ग्रामीण भागात यापूर्वी चार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर गेल्या पाच दिवसांपूर्वी शिवाजीनगर परिसरातील ८६ वर्षीय वृद्धाला कोरोनाची बाधा झाली होती. नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना सदर रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सदर वृद्धाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील १७ व त्याने सिन्नरला ज्या खासगी रुग्णालयात उपचार घेतले तेथील दहा जणांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्या २७ जणांना कॉरण्टाइन करण्यात आले होते. या २७ जणांपैकी २६ जणांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी सिन्नरचे खासगी रुग्णालयातील ३० वर्षे डॉक्टरला कोरोनाची बाधा असल्याचे निष्पन्न झाले आहे, तर उर्वरित वृद्धाच्या कुटुंबातील सर्वच्या सर्व १७ जण निगेटिव्ह निघाले आहेत. रुग्णालयातील दहापैकी नऊजण निगेटिव्ह असून, रुग्णावर उपचार करणाºया डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे.
--------
परिसर सील
सिन्नर शहरात नव्याने आढळून आलेला रूग्ण राहत असलेला परिसर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, संचारबंदी कडक करण्यात आली आहे. परिसर सील करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी संजय केदार यांनी दिली. दरम्यान, सदर डॉक्टरच्या संपर्कात येणाºया रुग्ण व नातेवाईक यांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्छाव यांनी दिली.