सिन्नरला आणीबाणीतील सत्याग्रहींचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:34+5:302021-06-30T04:10:34+5:30
२५ जून १९७५ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताच्या लोकशाहीची सर्व मूल्य पायदळी तुडवून आणीबाणी लागू केली होती. ...
२५ जून १९७५ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताच्या लोकशाहीची सर्व मूल्य पायदळी तुडवून आणीबाणी लागू केली होती. भारतीय जनसंघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी या आणीबाणी विरोधात मोठी लढाई लढली होती. त्या पार्श्वभूमीवर सिन्नरमधील आणीबाणी काळात तुरुंगवासात यातना भोगलेल्या सत्याग्रहींचा भारतीय जनता पार्टीच्यावतीने त्यांच्या घरी जाऊन सन्मान केला. त्यांची विचारपूस करीत त्या काळात घडलेल्या आठवणींची माहिती घेतली.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, जयंत आव्हाड, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेश कपूर, युवा तालुकाध्यक्ष सचिन गोळेसर, जिल्हा युवा ओबीसी अध्यक्ष मनोज शिरसाट, जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष मंगला झगडे, शहर उपाध्यक्ष हितेश वर्मा, दर्शन भालेराव, सरचिटणीस डॉ. विशाल क्षत्रिय आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - २९ सिन्नर १
सिन्नर येथे आणीबाणी काळात तुरुंगवासात यातना भोगलेल्या सत्याग्रहींचा सन्मान करताना भाजपाचे ज्येष्ठ नेते जयंत आव्हाड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, राजेश कपूर आदि.
===Photopath===
290621\29nsk_23_29062021_13.jpg
===Caption===
सिन्नर येथे आणीबाणी काळात तुरुंगवासात यातना भोगलेल्या सत्याग्रहींचा सन्मान करताना भाजपाचे ज्येष्ठ नेते जयंत आव्हाड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, राजेश कपूर आदि.