सिन्नर : ‘रेझिंग डे’निमित्त विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्याला भेट पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली शस्त्रास्त्रांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:01 AM2018-01-07T00:01:01+5:302018-01-07T00:24:19+5:30
सिन्नर : येथील पोलीस ठाण्यात रेझिंग डे निमित्त ब. ना. सारडा विद्यालयातील विद्यार्थ्यांना बोलावून पोलीस ठाण्यातील रचना, कार्यपध्दती, कामकाज, तक्रार निवारण करण्याची पध्दत याविषयी माहिती देण्यात आली.
सिन्नर : येथील पोलीस ठाण्यात रेझिंग डे निमित्त ब. ना. सारडा विद्यालयातील विद्यार्थ्यांना बोलावून पोलीस ठाण्यातील रचना, कार्यपध्दती, कामकाज, तक्रार निवारण करण्याची पध्दत याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रांचीही माहिती देण्यात आली.
येथील ब. ना. सारडा विद्यालयातील विद्यार्थिनींना पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आपल्या कायदा सुव्यवस्थेबाबतीत माहिती दिली. कुठलेही हत्यार बाळगणे हा गुन्हा आहे. यासाठी नियमाने कुठल्याही हत्यारासाठी परवानगी आवश्यक आहे. पोलीस ठाण्यात जी हत्यारे असतात त्यांचा परिस्थिती पाहूनच वापर करावा लागतो.
प्रथम लाठीचार्ज , नंतर अश्रुधूर व त्यानंतर शेवटच्या क्षणी फायरींग करावी लागते. परंतु यासाठी पण वरिष्ठ अधिकाºयांची परवानगी घेणे आवश्यक असते. पोलीस व नागरीक आणि उद्याचे भविष्य घडविणारे विद्यार्थी यांना पोलीस ठाणे कसे काम करते तसेच पोलिसांचे व आपले संबंध अधिक मजबूत कसे होतील यासाठी आजचा दिवस असल्याचे देशमुख यांनी सांगितले. शस्त्र बाळगणे हा जरी गुन्हा असला तरी या शस्त्रांचा वापर देशासाठी फार महत्त्वाचा आहे. देशहितासाठी शस्त्र फार महत्त्वाचे असून, त्यासाठी सेना भक्कम आहे. पोलीस शिपाई सचिन गवळी, भगवान शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रांची माहिती दिली.