सिन्नर : मुख्याध्यापक संघाच्या प्रतिनिधींची माहिती वैद्यकीय देयकाचे दोन कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:06 AM2017-11-13T00:06:33+5:302017-11-13T00:10:43+5:30
जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या शिक्षकांच्या वैद्यकीय देयकापोटी २ कोटी १८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
सिन्नर : जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या शिक्षकांच्या वैद्यकीय देयकापोटी २ कोटी १८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी ही माहिती मुख्याध्यापक संघ, सटाणा तालुका मुख्याध्यापक संघाच्या प्रतिनिधींना दिली.
मुख्याध्यापक संघाचे एस.बी. देशमुख, सुरेश शेलार, एन.आर. देवरे, संजय देसले, बी. आर. पाटील, कैलास वाघ, शरद नेरकर, कैलास बच्छाव, महेंद्र कुवर, संजय पवार, एस. एन. देवरे, डी. एस. गुंजाळ, सुदाम अिहरे, जयप्रकाश कुवर, संभाजी जाधव, बी. व्ही. पांडे, एम. डी. काळे हे उपस्थित होते. फरक देयके, रजा रोखीकरण देयकांनाही पुढील आठवड्यात मंजुरी देणार असल्याचे बच्छाव यांनी सांगितले. संच मान्यतेची आॅनलाइन माहिती भरताना विद्यार्थी, शिक्षक माहिती, माध्यम वर्ग, खोल्या, यात चुका होऊ नये म्हणून मुख्याध्यापक, लिपिकांसाठी कार्यशाळा घेणार असल्याचे ते म्हणाले.