सिन्नरला अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मानस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:25 AM2021-03-13T04:25:19+5:302021-03-13T04:25:19+5:30

तालुक्यातील माळवाडी (शिवाजीनगर) येथे एमआयटी, पुणे आणि राष्ट्रीय सरपंच संसदच्यावतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच परिषदेचे ...

Sinnar intends to set up an up-to-date training center | सिन्नरला अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मानस

सिन्नरला अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मानस

Next

तालुक्यातील माळवाडी (शिवाजीनगर) येथे एमआयटी, पुणे आणि राष्ट्रीय सरपंच संसदच्यावतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक प्रकाश महाले, तालुका समन्वयक समाधान गायकवाड, माजी सरपंच संपत आव्हाड आदींसह मान्यवर उपस्थित होते.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, माळवाडीच्या सरपंच जयश्री आव्हाड व घोटेवाडीच्या सरपंच मंजुश्री घोटेकर, दत्तनगरच्या सरपंच मीरा पालवे, शिवाजीनगरच्या उपसरपंच सुनंदा कांगणे, सदस्य ज्योती केकान, सुरेखा आव्हाड, अंगणवाडी सेविका दाते, रत्नाबाई आव्हाड, शोभा पालवे, शैला आव्हाड, म्हाळू साबळे, भीमा आव्हाड, भास्कर पालवे यांच्यासह परिसरातील नवनिर्वाचित महिला सदस्य, अंगणवाडी सेविका यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विकासाच्या योजना राबवून महिलांनी गावे आदर्श करावीत, असा सल्ला तालुका समन्वयक समाधान गायकवाड यांनी दिला.

कार्यक्रमाला शिवाजी आव्हाड, रघुनाथ आव्हाड, दत्ता कांगणे, एकनाथ आव्हाड, चंद्रकांत पाटील, रामनाथ साबळे, संजय आव्हाड, विष्णूपंत आव्हाड, अण्णासाहेब आव्हाड, भास्कर पालवे, नामदेव पालवे, शांताराम पालवे, ज्ञानेश्वर गारे, माजी उपसरपंच काळूराम पालवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो -

सिन्नर तालुक्यातील माळवाडी येथे सरपंच संसदेच्यावतीने महिला सरपंचांचा सत्कार समन्वयक योगेश पाटील यांनी केला. यावेळी शीतल सांगळे, प्रकाश महाले, समाधान गायकवाड, संपत आव्हाड आदी उपस्थित होते.

Web Title: Sinnar intends to set up an up-to-date training center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.