त्रिपुरारी पौर्णिमेपासून सुरू होणार सिन्नर-जाळीचा देव बस सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:18 PM2020-11-23T23:18:28+5:302020-11-24T02:13:26+5:30
सिन्नर : सिन्नर आगारातून श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे जाण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेपासून (दि.२९) पूर्वीप्रमाणे दर पौर्णिमेला बस सुरू होणार आहे.
सिन्नर : सिन्नर आगारातून श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे जाण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेपासून (दि.२९) पूर्वीप्रमाणे दर पौर्णिमेला बस सुरू होणार आहे.
श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे जाण्यासाठी पूर्वी दर पौर्णिमेला सिन्नर आगारातून बस सेवा सुरू होती. परंतु कोरोना महामारीच्या काळात मंदिरे व बससेवा बंद असल्याने ही बससेवा खंडित झाली होती. महाराष्ट्र शासनाने बससेवा व मंदिरांमध्ये भाविकांना दर्शन घेण्यासाठी परवानगी दिल्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेपासून (दि. २९) दर पौर्णिमेला जाळीचा देव येथे जाणारी बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन भाजपचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी यांनी आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी यांना दिले. यावेळी स्थानक०प्रमुख सविता काळे, वाहतूक नियंत्रक सोपान ओढेकर, देवा सांगळे, नीलेश कर्पे, गोरख बगडाने उपस्थित होते.
सूर्यवंशी यांनी निवेदन स्वीकारून रविवार (दि.२९) त्रिपुरारी पौर्णिमेपासून बस उपलब्ध करून दिली. भाविकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बस जाण्याचा मार्ग सिन्नर येथून बारागाविपंप्री, नांदूरमधमेश्वर, दत्ताचे शिंगवे, कनाशी, शेंदुर्णीमार्गे श्रीक्षेत्र जाळीचा देव असा असेल.