सिन्नरला पावसाने भिंत कोसळून वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 01:47 AM2022-06-02T01:47:16+5:302022-06-02T01:47:51+5:30

सिन्नर येथील शिर्डी रोडलगत शेडची भिंत अंगावर पडल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

Sinnar killed an old man when a wall collapsed in the rain | सिन्नरला पावसाने भिंत कोसळून वृद्ध ठार

सिन्नरला पावसाने भिंत कोसळून वृद्ध ठार

googlenewsNext
ठळक मुद्देवादळी वारा: मान्सूनपूर्व पावसाचेही आगमन

सिन्नर : येथील शिर्डी रोडलगत शेडची भिंत अंगावर पडल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. शिर्डी रोडलगत भिंत अंगावर पडून नारायण हरिभाऊ गवळी (६२) यांचा मृत्यू झाला.

राज्यात मान्सून दाखल होण्यास काही दिवस शिल्लक असताना सिन्नर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. पाऊस सुरू झाल्याने येथील गवळी मळ्यात नारायण गवळी हे गोऱ्हा सोडून अन्यत्र बांधण्यासाठी गेले होते. त्याचवेळी वादळी वाऱ्याने शेडची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. त्यात ते गंभीर जखमी झाले. गवळी कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना उपचारांसाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

विशाल गवळी यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक रामदास धुमाळ पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Sinnar killed an old man when a wall collapsed in the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.