सिन्नरला कामगारांसाठी ईएसआय रुग्णालय सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:16 AM2021-02-25T04:16:15+5:302021-02-25T04:16:15+5:30
सिन्नर : तालुक्यातील औद्योगिक कामगारांसाठी कर्मचारी राज्य निगमच्या औषधालयासह शाखा कार्यालय सुरू करण्यात आले आहे. येथील औद्योगिक वसाहतातील कामगारांसाठी ...
सिन्नर : तालुक्यातील औद्योगिक कामगारांसाठी कर्मचारी राज्य निगमच्या औषधालयासह शाखा कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
येथील औद्योगिक वसाहतातील कामगारांसाठी असलेली ई. एस. आय. योजना २०१६पासून लागू झाली असून, २५ हजार कामगार विविध आस्थापनांद्वारे या योजनेशी जोडले गेले आहेत. हे कामगार आणि त्यांचे कुटुंबीय अशा सुमारे एक लाख व्यक्तिंना या सुविधाचा लाभ मिळणार आहे. प्राथमिक आरोग्य सुविधा आणि शाखा कार्यालयातून देण्यात येणारे रोखीचे हितलाभ या दोन्ही गोष्टी एकाच कार्यालयातून उपलब्ध करून देणारे हे नाशिक जिल्ह्यातील पहिले कार्यालय आहे. या सुविधांचा सगळ्या लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे अपर आयुक्त प्रणय सिन्हा यांनी केले. यावेळी औषधालयासह शाखा कार्यालयाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत आहिरे, उपक्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी उपनिदेशक निश्चलकुमार नाग, सहाय्यक निदेशक जे. बी. खैरनार, दत्तात्रय कांबळे आदी उपस्थित होते.