सिन्नरला बॅँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 03:01 PM2019-09-21T15:01:05+5:302019-09-21T15:01:15+5:30
सिन्नर : येथील चौदा चौक वाड्यातील सांगळे कॉम्प्लेक्समधील बँक ऑफ इंडियाचे एमटीएम अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी मध्यरात्री फोडल्याचा प्रकार उघडकीस ...
सिन्नर : येथील चौदा चौक वाड्यातील सांगळे कॉम्प्लेक्समधील बँक ऑफ इंडियाचे एमटीएम अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी मध्यरात्री फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. एटीएममध्ये अंदाजे २५लाख रूपयांची रक्कम होती. तथापि, त्यातून किती रक्कम चोरीला गेली किंवा काय याबाबत खुलासा होऊ शकलेला नाही. एमटीएम फोडलेले असल्याबाबत विनायक सांगळे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शहानिशा केली. एक अज्ञात चोरट्याने एटीएम फोडून त्याचे दोन तुकडे केलेले होते. तिजोरी एटीएम केबिनच्या बाहेर पडलेली आढळून आली. गुरूवारी दुपारी दीडच्या सुमारास एमटीएममध्ये दहा लाख रुपये टाकण्यात आले होते. त्याआधीची काही रक्कम एटीएममध्ये होती. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा व हार्डडिस्क पळवून नेल्यामुळे फुटेज मिळालेले नाही. बँकेच्या एमटीम विभागाच्या तज्ज्ञांना दिल्ली येथून पाचारण करण्यात आलेले आहे. ते आल्यानंतरच नेमकी चोरी किती झाली हे कळू शकणार आहे. घटनास्थळावरून एक लोखंडी पहार जप्त करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिस प्रा. लि.चे व्यवस्थापक मिलिंद नेहे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार आर. एम. धुमाळ पुढील तपास करीत आहेत.