सिन्नरला घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:16 AM2021-02-25T04:16:18+5:302021-02-25T04:16:18+5:30
याबाबत संतोष चंपालाल डारांगे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार डारांगे यांचे सासूसासरे येथे वास्तव्यास असून सास-यांची तब्येत बिघडल्याने ...
याबाबत संतोष चंपालाल डारांगे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार डारांगे यांचे सासूसासरे येथे वास्तव्यास असून सास-यांची तब्येत बिघडल्याने त्यांना एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप लावलेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी संधी साधून दरवाचाजे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी २० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, १ चांदीचा छल्ला, गॅसची टाकी व २० हजार रुपये रोख असा ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सोमवारी कुटुंबीय घरी परत आल्यानंतर दरवाजाचे कुलूप त्यांना तुटलेले दिसून आल्यावर चोरीचा संशय बळावला. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे स्पष्ट झाल्याने डारांगे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सिन्नर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास धुमाळ करीत आहेत.