सिन्नर एमआयडीसीत वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 06:23 PM2018-09-18T18:23:36+5:302018-09-18T18:23:51+5:30

सिन्नर : औद्योगिक वसाहतीत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने कारखन्यांचे मोठे नुकसान होते. तर उद्योजकांनी आपला व्यवसाय कशा पध्दतीने करायचा, असा प्रश्न उद्योजकांसमोर पडला आहे.

Sinnar MIDC dissipated power supply | सिन्नर एमआयडीसीत वीजपुरवठा खंडित

सिन्नर एमआयडीसीत वीजपुरवठा खंडित

Next

सिन्नर : औद्योगिक वसाहतीत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने कारखन्यांचे मोठे नुकसान होते. तर उद्योजकांनी आपला व्यवसाय कशा पध्दतीने करायचा, असा प्रश्न उद्योजकांसमोर पडला आहे. त्यामुळे सिन्नरच्या औद्योगिक वसाहतीत सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी उद्योजकांनी वीज वितरण अधिकाऱ्यांकडे केली.
माळेगाव औद्योगिक वसाहतीतल्या निमा कार्यालयात उद्योजक आणि वीज वितरण अधिकाºयांचे चर्चासत्र नुकतेच पार पडले. यावेळी कारखानदारांनी आपले गाºहाणे मांडले. यावेळी व्यासपिठावर अधीक्षक अभियंता पी. एम. दारूली, कार्यकारी अभियंता एम. बी. ठाकरे, निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष सुधीर बडगुजर, अतिरिक्त चिटणीस संदिप भदाणे, उर्जा उपसमितीचे अध्यक्ष रावसाहेब रकिबे, उर्जा उपसमितीचे अध्यक्ष बबन वाजे, पायाभूत उपसमितीचे अध्यक्ष किरण वाजे, महावितरणचे उपअभियंता एस. व्ही. पवार आदी उपस्थित होते. सिन्नर औद्योगिक परिसरात मोठया प्रमाणात स्टील, रोलींग मिल, प्लॅस्टीक मोल्डींग उद्योग, फुड इंडस्ट्रिज, फर्मासिटीकल आदी सातत्याने प्रक्रिया करणारे उद्योग मोठया प्रमाणात आहे. गेल्या काही दिवसांपासून वसाहतीत होणाºया खंडीत वीज पुरवठयामुळे या उद्योगांचे लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. औद्योगिक क्षेत्रात सुरळीत वीज पुरवठा होणे आवश्यक आहे.
महावितरणातर्फे पावसाळयाआधी मेंटनन्स काम केल्याचा दावा करण्यात येत असला तरी दिवसातून तीन ते चार वेळेस वीज पुरवठा खंडीत होत आहे. एकीकडे मेक ईन नाशिक व्दारे नाशिकमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणुकीसाठी प्रयत्न होत असतांना दुसरीकडे सततच्या खंडीत वीज पुरवठयामुळे कारखानदार त्रस्त होत आहेत. खंडीत व अपुºया वीज पुरवठयामुळे अनेक मल्टीनॅशनल कंपन्या बाहेरील राज्यात जाण्याच्या तयारीत आहेत. वसाहतीतील एक फिडर खंडीत झाला तरी याचा परिणाम वसाहतीतील २०० ते ३०० कंपन्यांना होत आहे. खराब डिस्ट्रिबुशन बॉंक्स, बॉक्समध्ये केलेली चुकीची वायरींग, झाडांमध्ये अडकलेल्या केबल्स व त्यामुळे होणारा खंडीत वीजपुरवठा तसेच वसाहतीतील उद्योजकांच्या अनेक समस्या रकिबे यांनी अधिकाºयांना सांगितल्या. सिन्नर औद्योगिक वसाहतीत होणाºया खंडीत वीज पुरवठयाची दखल घेत ४५ दिवसांच्या आत वसाहतीतील सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन अधिक्षक अभियंता पी. एम. दारूली यांनी यावेळी दिले. यासंदर्भात कार्यकारी अभियंता एम. बी. ठाकरे यांनी येत्या पंधरा दिवसांत प्राथमिक देखभालीचे काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. याचबरोबर वसाहतीत सर्वात जास्त वीज पुरवठा खंडीत होणाºया फिडर क्रमांक ३ चा मेंटनन्सचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्यावर लवकरच काम सुरू होणार असल्याचे सांगीतले. नविन सब स्टेशनचा प्रस्ताव प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे यावेळी अधिकाºयांनी सांगीतले.

Web Title: Sinnar MIDC dissipated power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.