सिन्नर नगरपरिषदेकडून स्वच्छतेचा आग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 05:06 PM2019-02-11T17:06:24+5:302019-02-11T17:12:17+5:30
सिन्नर : पर्यावरणपूरक कापडी पिशव्या महिलांना वाटप करत स्वच्छतेचा संदेश देणारा हळदी-कुंकू कार्यक्रम सिन्नर नगरपरिषदेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील दीड हजार महिलांनी उपस्थिती लावत हळदी कुंकू समारंभ व विविध स्पर्धांचा आनंद लुटला.
नगर परिषदेच्या महिला बालकल्याण विभाग व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू कार्यक्रम व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी एकत्र येवून चार क्षण व्यतीत करावेत, आपल्या विचारांची आदान-प्रदान करावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून दीप्ती राजाभाऊ वाजे उपस्थित होत्या. यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, महिला व बालकल्याण सभापती प्रतिभा नरोटे, तेजस्वीनी वाजे, सविता डगळे, रोहिणी मोरे, सौ. लोखंडे, नगरसेवक मंगला शिंदे, नलिनी गाडे, निरूपमा शिंदे, सुजाता तेलंग, वासंती देशमुख, सुजाता भगत, ज्योती वामने, विजया बर्डे, प्रीती वायचळे, अलका बोडके, गौतमी लोकसंचालीत साधन केंद्राच्या क्षेत्रीय सामन्वयक प्रीती लोंढे, उन्नती शहरस्तरीय संघाच्या अध्यक्ष निलोफर सय्यद आदिंसह शहराच्या विविध भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.