सिन्नर खबरबात :श्रेयवादाची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:17 AM2021-08-26T04:17:20+5:302021-08-26T04:17:20+5:30
कडवा पाणीयोजनेची श्रेयवादाची लढाई सिन्नर शहर व उपनगराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांची पाणीयोजना अस्तित्वात आली आहे. ...
कडवा पाणीयोजनेची श्रेयवादाची लढाई
सिन्नर शहर व उपनगराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांची पाणीयोजना अस्तित्वात आली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या योजनेचे पाणी सिन्नरकरांना चाखायला मिळायला लागले. या योजनेच्या पूर्णत्वास कोकाटे व वाजे यांचे योगदान डावलून चालणार नाही. मात्र, योजना पूर्णत्वावरून चांगलीच श्रेयवादाची लढाई दिसून आली. आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत यावरून राजकारण तापेल यात शंका नाही.
कोट....
‘गेल्या पावणेपाच वर्षात माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्त्वाखाली कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली. शहर व उपनगरात रस्त्यांच्या कामासह भूमिगत गटारी व अन्य मोठी विकासकामे झाली. सिन्नरकरांना चांगले पाणी मिळू लागले. विकासकामात सिन्नरकर समाधानी आहेत. कोरोनानंतर शासनाकडून निधीची कपात होऊ लागल्याने अडचणी येत आहेत.
किरण डगळे, नगराध्यक्ष, सिन्नर
चौकट-
‘आम्ही विरोधात होतो. मात्र, गेल्या पाच वर्षांत सिन्नरकरांसाठी एकाही विकासकामांना विरोध केला नाही. सत्ताधारी शिवसेनेने एकही ठोस विकासकामे केले नाही. कडवा पाणीयोजना आमदार कोकाटे यांच्यामुळे पूर्ण झाली. रस्ते गटारी होतच असतात. मात्र, सत्ताधाऱ्यांना सिन्नरच्या वैभवात भर घालता येईल असे एकही काम करता आले नाही.
नामदेव लोंढे, विरोधी गटनेते, सिन्नर नगरपरिषद