सिन्नर आता तीन दिवस पूर्ण बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 08:40 PM2020-04-28T20:40:37+5:302020-04-28T23:02:59+5:30

सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अत्यावश्यक सेवावगळता लॉकडाउन केलेला असताना शहर परिसरात भाजीपाला, किरणा दुकाने, मेडिकल सुरू असल्याने नागरिक घराबाहेर पडत आहेत. भविष्यात कोरोनाचं भय इथलं संपत नाही अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी खबरदारी म्हणून मेडिकलवगळता भाजीपाला, किराणा दुकानांसह सर्वच दुकाने आठवड्यातून ३ दिवस शुक्रवार, शनिवार व रविवारी बंद ठेवण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रशासनाला दिल्या.

 Sinnar is now completely off for three days | सिन्नर आता तीन दिवस पूर्ण बंद

सिन्नर आता तीन दिवस पूर्ण बंद

googlenewsNext

सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अत्यावश्यक सेवावगळता लॉकडाउन केलेला असताना शहर परिसरात भाजीपाला, किरणा दुकाने, मेडिकल सुरू असल्याने नागरिक घराबाहेर पडत आहेत. भविष्यात कोरोनाचं भय इथलं संपत नाही अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी खबरदारी म्हणून मेडिकलवगळता भाजीपाला, किराणा दुकानांसह सर्वच दुकाने आठवड्यातून ३ दिवस शुक्रवार, शनिवार व रविवारी बंद ठेवण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रशासनाला दिल्या. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी, उपाययोजना तसेच तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस आमदार कोकाटे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, तहसीलदार राहुल कोताडे, सिन्नरचे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, वावीचे सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, मुख्याधिकारी संजय केदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या विरोधातील भविष्यातील लढाईसाठी उपजिल्हा रुग्णालयात डेडीकेटेड कोरोना हेल्थ केअर सेंटर उभारण्यात येत असून, १०० कॉटची व्यवस्था करण्यात आली असून, सिन्नर महाविद्यालयाच्या आवारातील डी.एड. कॉलेज व मुलींच्या वसतिगृहात कोव्हीड-१९ केअर सेंटर सुरू करण्यात येत असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी सांगितल्यानंतर नगरपालिका, पंचायत समिती तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ४०० बेडची व्यवस्था करण्यासंदर्भात आमदार कोकाटे यांनी सूचना दिल्या. कोव्हीड-१९ केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णाचा स्वॅब घेण्यासाठी स्थानिक लॅब टेक्निशियन घ्यावा, तसेच स्वॅब तपासणीसाठी नाशिकला न जाता येथून थेट पुण्याला पाठविण्याची व्यवस्था करा, असेही ते म्हणाले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जगदाळे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधून त्यांना याबाबत सूचित केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते विजय गडाख, पंचायत समिती सदस्य रवि पगार, तातू जगताप तसेच बाबा कांदळकर, पी. जी. आव्हाड आदींसह अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, शहर बंद ठेवण्याबाबत तहसीलदार राहुल कोताडे यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याधिकारी संजय केदार, किराणा व्यापारी व मटन विक्रेत्यांचे प्रतिनिधी यांची चर्चा झाली होती. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून शहरातील किराणा व्यापारी, मटन विक्रेत्यांचे प्रतिनिधी यांनी स्वयंस्फूर्तीने दर आठवड्याला शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस अत्यावश्यक सेवावगळून शंभर टक्के बंद पाळण्याबाबत सकारात्मक पाऊल उचलले होते. या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे पुढील निर्णय होईपर्यंत शहरातील किराणा दुकाने, भाजी बाजार, मटन शॉप आठवड्यात केवळ चारच दिवस सुरू राहतील.
------
कारवाईचा बडगा उगारा
लॉकडाउनच्या काळात सर्वांनी घरात थांबणे गरजेचे असताना नागरिक बेपर्वाई करत असून, भाजीपाला, किराणा, औषधे घेण्याच्या बहाण्याने शहरभर फिरत आहेत. यापूर्वी आठवडे बाजाराची संकल्पना होती. तालुकाभरातून नागरिक आठवडाभराच्या जीवनावश्यक वस्तू घेऊन जात असत, मात्र आता दररोज भाजीपाला, किराणा कसा लागतो? प्रशासनाने याला आवर घालण्यासाठी कडक धोरण अवलंबवावे. भाजी बाजार, किराणा दुकानांसह सर्व सेवा तीन दिवस बंद ठेवाव्यात. केवळ मेडिकल सुरू राहतील. औषधी घेण्यासाठी येणाऱ्याकडे डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन तपासावे, संचारबंदीचे उल्लंघन करणाºया दुकानदारांचे परवाने रद्द करा अशा कडक सूचना आमदार कोकाटेंनी प्रशासनाला केल्या. दूध वितरणासाठी सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ६ ते ८ अशा वेळा निश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

Web Title:  Sinnar is now completely off for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक