सिन्नरला आता दोन ठिकाणी भाजीबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 08:45 PM2020-05-07T20:45:53+5:302020-05-07T23:51:12+5:30
सिन्नर : सरदवाडी रस्त्यावरील उपनगरात कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण आढळल्याने आडवा फाट्यावरील भाजीबाजार बंद करण्यात आला असून, पर्यायी जागा मिळाल्याने शहराच्या दोन भागात भाजीबाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी संजय केदार यांनी दिली.

भाजीबाजारासाठी पर्यायी जागांचा शोध घेण्यात येत होता. त्यात दोन जागा मिळाल्या आहेत. शिर्डी रस्त्यावर केला फॅक्टरीसमोर नगर परिषदेचा मोकळा भूखंड असून, तेथे आता एक बाजार भरेल तर नाशिक रस्त्यावरील हॉटेल न्यू वैष्णवीच्या मागे मेंगाळ वस्तीजवळ असणाऱ्या मोकळ्या जागेत दुसरा भाजी बाजार बसणार आहे.
शहरातील भाजी विक्रेत्यांशी याबाबत चर्चा झाली असून, ज्यांना जिथे सोयीचे वाटेल तेथे ते भाजी विक्रीसाठी बसू शकतात, असे केदार यांनी स्पष्ट केले. दोन्ही भाजी बाजार सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंतच खुले राहणार असून, त्यांनतर भाजी विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. भाजी बाजारात बसणाºया विक्रेत्यांनी मास्क, हातमोजे वापरणे बंधनकारक असून, दोन दुकानांमध्ये कमीत कमी ६-७ फूट अंतर ठेवावे लागणार आहे. ग्राहक आणि विक्रेत्यांमध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. शहरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून, आता याचा संसर्ग इतरांमध्ये वाढू नये यासाठी सर्वांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे.