डफाच्या तालावर वीरांचा पदन्यास सिन्नर : भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात धूलिवंदन आणि वीरपाडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:59 IST2018-03-03T23:59:40+5:302018-03-03T23:59:40+5:30
सिन्नर : शहर आणि तालुक्यात धूलिवंदनसह वीर पाडवा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

डफाच्या तालावर वीरांचा पदन्यास सिन्नर : भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात धूलिवंदन आणि वीरपाडवा
सिन्नर : शहर आणि तालुक्यात धूलिवंदनसह वीर पाडवा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. होळीच्या दिवशी दुर्गुणांची होळी करून धूलिवंदनच्या दिवशी पूर्वजांचा मानसन्मान करण्यासाठी वीर नाचवून त्यांचा मानपान करण्यात आला. शहरात भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात डफाच्या तालावर झालेला पदन्यास पाहण्यासाठी हजारों सिन्नरकरांनी गर्दी केल्याचे चित्र होते.
डफांच्या तालावर पदन्यास करण्याची सिन्नरकरांची परंपरा आजही सुरूआहे. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजच्या माहिती व तंज्ञानाच्या काळातही तेवढ्याच आनंदाने व भक्तिभावाने साजरी केली गेली. सण व संस्कृती टिकविण्यासाठी पारंपरिक पद्धतीत थोड्याफार प्रमाणात बदल झाला असला तरी त्याचा उत्साह मात्र आजही टिकून असल्याचे दिसून येते. गावठा परिसरातील मंदिराजवळ असलेल्या मानाच्या होळीला नैवेद्य दाखविण्यात आला.