सिन्नरला हुतात्म्यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:14 AM2021-04-24T04:14:17+5:302021-04-24T04:14:17+5:30

सिन्नर : २२ एप्रिल १९७३ला भीषण दुष्काळावेळी विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चावर झालेल्या गोळीबारात पाचजण हुतात्मे झाले होते. शहरवासीयांच्यावतीने ...

Sinnar pays homage to the martyrs | सिन्नरला हुतात्म्यांना आदरांजली

सिन्नरला हुतात्म्यांना आदरांजली

Next

सिन्नर : २२ एप्रिल १९७३ला भीषण दुष्काळावेळी विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चावर झालेल्या गोळीबारात पाचजण हुतात्मे झाले होते. शहरवासीयांच्यावतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र वाहण्यात आले. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष अरविंद गुजराथी, नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक शैलेश नाईक, पंकज मोरे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, माजी नायब तहसीलदार दत्ता वायचळे, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, उपअभियंता अशोक कटारे, ॲड. विलास पगार, अनिल उगले, नीलेश चव्हाण, आदी उपस्थित होते.

हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी नगर परिषदेने दुपारी बारा वाजता भोंगा वाजविल्यानुसार शहरवासीयांनी घरातच दोन मिनिटे स्तब्ध होऊन अभिवादन केले.

फोटो - २३ सिन्नर हुतात्मा

- सिन्नर येथे हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी हुतात्मा चौकात माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी अरविंद गुजराथी, किरण डगळे, हेमंत वाजे, शैलेश नाईक आदी उपस्थित होते.

===Photopath===

230421\23nsk_6_23042021_13.jpg

===Caption===

फोटो - २३ सिन्नर हुतात्मा - सिन्नर येथे हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी हुतात्मा चौकात पुष्पचक्र अर्पण करताना माजी आमदार राजाभाऊ वाजे. समवेत अरविंद गुजराथी, किरण डगळे, हेमंत वाजे, शैलेश नाईक आदी.

Web Title: Sinnar pays homage to the martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.